Homeसामाजिकहजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग – कालिपुत्र कालीचरण महाराजांच्या महाआरतीने दुमदुमला परिसर, प्रशांत...

हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग – कालिपुत्र कालीचरण महाराजांच्या महाआरतीने दुमदुमला परिसर, प्रशांत भागवत युवा मंचाचे आयोजन

हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग – कालिपुत्र कालीचरण महाराजांच्या महाआरतीने दुमदुमला परिसर, प्रशांत भागवत युवा मंचाचे आयोजन

इंदोरी (ता. मावळ) : शारदीय नवरात्रोत्सवातील ललिता पंचमी निमित्त मावळ तालुक्यातील इंदोरी गावाने यंदा नवा इतिहास रचला. प्रशांत भागवत युवा मंचाच्या पुढाकाराने प्रथमच सामुदायिक कुंकुमार्चन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. तालुक्यातील विविध भागांतून पारंपरिक वेशभूषेत हजारो महिलांनी या सोहळ्यात सहभागी होत भक्तिभाव, ऐक्य आणि संस्कृतीचा संगम घडवून आणला.

कालिपुत्र कालीचरण महाराजांच्या महाआरतीला गर्दी

सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते कालिपुत्र कालीचरण महाराजांची महाआरती. त्यांच्या आरतीवेळी इंदोरी गाव भक्तिरसात रंगून गेले. “जय भवानी, जय जिजाऊ” आणि “अंबे मात की जय” अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमले. तसेच शाहीर हरिदासजी शिंदे यांच्या संबळवादनासह शिवकालीन गोंधळींच्या पारंपरिक सादरीकरणाने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला.

नऊवारी साड्या, माथ्यावर फुलांचे गजरे, हातात ओवाळणीची ताटे घेऊन हजारो महिला देवीसमोर एकत्र आल्या. देवीला नारळ, फुले व कुंकवाची वाहिली अर्पण करून एकमेकींना कुंकू लावून सौभाग्य, सुख व समृद्धीचे आशीर्वाद मागण्यात आले. गावातील प्रत्येक चौक फुलांनी सजविण्यात आला होता. या सजावटीमुळे संपूर्ण इंदोरी भक्तिमयतेने उजळून निघाले.

या सोहळ्याला आमदार सुनील शेळके व त्यांच्या पत्नी सारिकाताई शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, मा. सभापती ज्योतीताई शिंदे, उपसरपंच बेबीताई बैकर, अनुपमाताई खांडगे, मेघाताई भागवत यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

तसेच सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, पोलीस प्रशासन, गावचे पदाधिकारी व हजारो नागरिकांनी सहभाग घेतल्याने हा सोहळा सर्वार्थाने भव्य व दिव्य ठरला.

जगदीश कुलकर्णी महाराज, शाहीर हरिदासजी शिंदे, धनंजय दाभाडे, सरपंच शशिकांत शिंदे, संकेत शिंदे, रामदास शिंदे, बबन आल्हाट, भरत घोजगे, सुनील वाळुंज, नंदकुमार शेलार, भानुदास दरेकर, सुनील दाभाडे, बाबासाहेब घोजगे, प्रदीप बनसोडे, चंद्रकांत भागवत, संदीप ढोरे, दिनेश चव्हाण, आशिष ढोरे, नितीन ढोरे, अंकुश ढोरे, अनिल राऊत, नंदकुमार भागवत आदी मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिक वाढली.

प्रशांत भागवत यांच्या दूरदृष्टीमुळे व उपक्रमशीलतेमुळे मावळ तालुक्यातील महिलांसाठी हा कुंकुमार्चन सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. महिला एकता, भक्तीभाव आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम या उपक्रमातून झाल्याने तालुक्याच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरेला नवे बळ मिळाल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

हजारो महिलांचे आभार मानताना प्रशांत भागवत म्हणाले – “मावळ तालुक्यातील भगिनींनी उत्स्फूर्ततेने या कुंकुमार्चन सोहळ्यात सहभाग घेतला. माझ्यासाठी खरे यश हेच की सर्व महिला सुरक्षितपणे, आनंदाने घरी परतल्या. या सोहळ्यामुळे देवीची कृपा सर्वांवर राहो व मावळ तालुका संस्कृती, भक्ती आणि परंपरेत समृद्ध होवो, हीच माझी प्रार्थना आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!