Homeमहत्त्वाचेबालिकेवरील अत्याचारप्रकरणी मावळात प्रचंड संताप. सकल मराठा महिला समाजतर्फे भव्य निषेध मोर्चा

बालिकेवरील अत्याचारप्रकरणी मावळात प्रचंड संताप. सकल मराठा महिला समाजतर्फे भव्य निषेध मोर्चा

बालिकेवरील अत्याचारप्रकरणी मावळात प्रचंड संताप. सकल मराठा महिला समाजतर्फे भव्य निषेध मोर्चा

लोणावळा : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव-डोंगराळे परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचारप्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून मावळ तालुक्यातही तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ सकल मराठा महिला समाज संघटनेतर्फे बुधवारी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

कार्ला शिवमंदिर येथून मोर्चाला सुरुवात झाली. सकल मराठा समाजाच्या महिला पदाधिकारींसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सरपंच-उपसरपंच, स्थानिक महिला कार्यकर्त्या तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी आणि हातात निषेध फलक घेऊन निघालेला हा मोर्चा शिस्तबद्धपणे कार्ला फाट्याकडे मार्गक्रमण करत होता.

कार्ला फाट्यावर पोहोचताच आंदोलकांनी काही काळ ठिय्या आंदोलन करत मुंबई–पुणे महामार्ग अंशतः रोखला. “अत्याचार करणाऱ्या आरोपीस तातडीने कठोर शिक्षा द्या”, “बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणा देत आरोपीला त्वरित फाशीची मागणी यातून जोरदारपणे व्यक्त करण्यात आली.

मोर्चात श्री एकविरा विद्यालय तसेच श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींचा मोठा सहभाग दिसून आला. तरुणींच्या या सहभागामुळे आंदोलनाला विशेष उर्जा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मोर्चादरम्यान परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असला, तरी पोलिसांनी संयम व दक्षता राखत रॅलीचे मार्गदर्शन केले. वाहनतळावर विशेष नियंत्रण ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू न देता मोर्चा शांततेत पार पडला.

निरागस बालिकेवरील अत्याचाराविरोधात संपूर्ण मावळ तालुका एकवटल्याचे प्रतिबिंब या मोर्चातून उमटले. समाजाने दाखविलेल्या एकजुटीतून या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी मोर्चाच्या शेवटी करण्यात आली.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!