Homeमहत्त्वाचेवडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सुनील ढोरे यांची निवड; स्वीकृत नगरसेवकपदी पंढरीनाथ ढोरे व...

वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सुनील ढोरे यांची निवड; स्वीकृत नगरसेवकपदी पंढरीनाथ ढोरे व संदीप म्हाळसकर

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील ढोरे यांची निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरीनाथ ढोरे आणि भारतीय जनता पार्टीचे संदीप म्हाळसकर यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया नगरपंचायतीच्या विशेष सभेत पार पडली.

या सभेचे पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष अबोली मयूर ढोरे यांनी काम पाहिले. निवड प्रक्रियेदरम्यान सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करत पारदर्शक पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रवीण निकम उपस्थित होते.

उपनगराध्यक्षपदी सुनील ढोरे यांची निवड जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी एकमेकांचे अभिनंदन करत जल्लोष केला. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल पंढरीनाथ ढोरे व संदीप म्हाळसकर यांचेही उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.

नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुनील ढोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “नगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रशासन यांच्यासोबत समन्वय ठेवून शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाईल.”

या निवडीमुळे नगरपंचायतीतील सत्ताधारी आघाडी अधिक बळकट झाली असून आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!