Homeताज्या बातम्याजागतिक महिला दिनानिमित्त वडगाव नगरपंचायतीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जागतिक महिला दिनानिमित्त वडगाव नगरपंचायतीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जागतिक महिला दिनानिमित्त वडगाव नगरपंचायतीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर

वडगाव मावळ (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडगाव नगरपंचायत व विघ्नहर्ता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव कातवी शहरातील महिला भगिनींसाठी एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, दिनांक ९ मार्च रोजी वडगाव नगरपंचायत कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे.

या आरोग्य शिबिरामध्ये महिलांच्या विविध आजारांवर मोफत तपासणी करण्यात येणार असून ईसीजी, हिमोग्लोबिन, किडनी, लिव्हर, रक्तदाब (बीपी), शुगर, कोलेस्ट्रॉल, एक्स-रे तसेच डोळे, कान, नाक व घसा यांसारख्या तपासण्या विनामूल्य करण्यात येणार आहेत. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे आणि त्यांना वेळेवर वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याची माहिती नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी दिली.

तसेच आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेला कॅल्शियम तसेच आयर्न फॉलिक अ‍ॅसिड (Iron Folic) गोळ्यांचेही मोफत वितरण करण्यात येणार आहे. नागरिकांना शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळावा यासाठी शिबिरात आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी दिली.

आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तसेच चालू रेशन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, वडगाव कातवी शहरातील सर्व माता व महिला भगिनींनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता ढोरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!