Homeमहत्त्वाचेआमदार सुनील शेळके यांचा लोणावळा दौरा; विविध विकास प्रकल्पांचा घेतला आढावा

आमदार सुनील शेळके यांचा लोणावळा दौरा; विविध विकास प्रकल्पांचा घेतला आढावा

आमदार सुनील शेळके यांचा लोणावळा दौरा; विविध विकास प्रकल्पांचा घेतला आढावा

लोणावळा : ३० मे – लोणावळा शहरातील विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत आमदार सुनील शेळके यांनी आज लोणावळ्यात आढावा बैठक घेतली. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व सुरक्षाविषयक गरजांशी संबंधित असलेल्या या प्रकल्पांची गती वाढवून नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हा या दौऱ्यामागचा उद्देश असल्याचे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.

दौऱ्यात त्यांनी खालील प्रमुख ठिकाणांना भेट देऊन कामाची सद्यस्थिती जाणून घेतली:

ग्रामीण पोलीस स्टेशन, तुंगार्ली – नवीन इमारतीचे काम लवकर पूर्ण होऊन ग्रामीण भागातील सुरक्षेसाठी सक्षम व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पांगळोली शासकीय इमारत – गावपातळीवर शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी या इमारतीचे महत्त्व अधोरेखित करत कामाला वेग देण्याचे निर्देश दिले.

खंडाळा गावातील शाळेची जागा – गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रस्तावित शाळेच्या जागेची पाहणी करण्यात आली.

लोणावळा शहर पोलीस स्टेशनची नवीन इमारत – शहराच्या वाढत्या गरजांनुसार तांत्रिकदृष्ट्या सक्षम पोलिस यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक – या प्रेरणादायी स्मारकाच्या कामाला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व असल्याचे सांगत लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आवाहन.

कन्याशाळा, भांगरवाडी – जीर्ण झालेल्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी तातडीची कार्यवाही गरजेची असल्याचे मत व्यक्त केले.

उपजिल्हा रुग्णालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक – आरोग्य व सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या या प्रकल्पांच्या कामांची प्रगती तपासण्यात आली.

या दौऱ्यानंतर लोणावळा नगरपरिषद कार्यालयात सर्व संबंधित अधिकारी, अभियंते आणि प्रशासकीय प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रत्येक प्रकल्पावरील कामाची सद्यस्थिती, येणाऱ्या अडचणी, निधीची स्थिती आणि पूर्णत्वासाठी लागणारा कालावधी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

“लोणावळा शहराचा सर्वांगीण विकास हा आपला संकल्प आहे. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,” असे मार्गदर्शन आमदार सुनील शेळके यांनी या वेळी केले.

लोणावळा शहरांमधील मागील अनेक वर्षापासून नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला नांगरगाव भांगरवाडी या उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पुणे हे स्वतः या कामाची पाहणी व लोणावळा शहरातील इतर विकास कामांचा आढावा घेण्यासाठी 5 जुलै रोजी लोणावळा शहरामध्ये येणार आहेत. लोणावळा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे तसेच लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारती देखील 80 ते 90% काम पूर्ण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण ही कामे 70 टक्के पूर्ण झाली आहेत. पुढील कामांना गती देण्यासाठी वाढीव निधी देण्याचे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. लोणावळा शहरातील भाजी मंडई विकसित करत असताना येथील अस्तित्वात असलेले व्यवसायिक यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन त्या पद्धतीने आराखडा तयार केला जाईल असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी नागरिकांना दिले. येथील कामगारांचा वारसा हक्क व अनुकंप हा प्रश्न देखील पुढील काही दिवसांमध्ये सोडवला जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

नागरिकांनी या आढावा बैठकीमध्ये अनेक समस्या आमदार सुनील शेळके यांच्यासमोर मांडल्या. नगरपरिषदेमध्ये वारंवार चकरा मारून देखील समस्या सुटत नसल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. पाच जुलै रोजी जिल्हाधिकारी लोणावळा शहरामध्ये येणार आहेत ते येण्यापूर्वी नागरिकांच्या या समस्यां न सुटल्यास जिल्हाधिकारी यांच्यासमोर या समस्यांचा पाढा वाचून दाखवला जाईल असे देखील आमदार सुनील शेळके यांनी ठणकावून सांगितले आहे.

नागरिकांना वेळ द्या आठवड्यातील एक दिवस निश्चित करा – शेळके

लोणावळा मुख्याधिकारी नागरिकांना भेटत नाहीत नागरिकांची योग्य प्रकारे संवाद साधत नाहीत अशा अनेक तक्रारींची सरबती या आढावा बैठकीमध्ये नागरिकांनी केली. त्यावर लोणावळा मुख्याधिकारी यांनी नागरिकांना वेळ देण्यासाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित करावा त्या दिवशी कार्यालयामध्ये उपस्थित राहत नागरिकांचे प्रश्न सोडवावेत त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात अशा सूचना आमदार सुनील शेळके यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांना दिल्या आहेत. तसेच अधिकारी वर्गाने नागरिकांना उलट उत्तरे देण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे व नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशा शब्दात अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!