Homeमहत्त्वाचेआमदार सुनील शेळके यांच्या देहू येथील ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार सुनील शेळके यांच्या देहू येथील ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देहू – मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र देहू येथील सरस्वती मंगल कार्यालय, गाथा मंदिर रोड येथे आयोजित ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि गरजा समजून घेऊन त्यांचे निराकरण शासनस्तरावर व्हावे, यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत, असा निर्धार आमदार शेळके यांनी व्यक्त केला.

Oplus_16908288

कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना लिखित स्वरूपात सादर केल्या तसेच आमदार शेळके यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत आपल्या भावना मांडल्या. सामाजिक, शैक्षणिक, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि नागरिक सुविधा या क्षेत्रातील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

आमदार शेळके यांनी सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि “जनतेच्या अडचणींचे तातडीने निराकरण होण्यासाठी सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून कार्यवाही करण्यात येईल,” असे आश्वासन दिले.

त्यांनी पुढे सांगितले की, “शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे, आणि आम्ही ती प्रामाणिकपणे पार पाडत आहोत.”

या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, जनतेच्या प्रश्नांना थेट ऐकून घेणारा आणि तत्परतेने प्रतिसाद देणारा ‘जनसंवाद’ हा उपक्रम विकासाच्या नव्या दिशा दाखविणारा ठरत आहे.या जनसंवाद कार्यक्रमाला देहू येथील सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते

जनतेशी थेट संवाद साधत समस्यांचे निराकरण करण्याची आमदार सुनील शेळके यांची तळमळ आणि सक्रियता यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!