Homeमहत्त्वाचेवडीवळे धरणाचे कालवे बंदिस्त करण्यासह आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेला गती

वडीवळे धरणाचे कालवे बंदिस्त करण्यासह आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेला गती

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई, २२ मे २०२५ – मावळ तालुक्यातील वडीवळे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांचे बंदिस्तीकरण तसेच आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेला गती देण्यासाठी बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती.

वडीवळे धरणाच्या कालव्यांद्वारे सुमारे ४४०६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. मात्र या उघड्या कालव्यांतून होणाऱ्या पाणी गळतीमुळे परिसरातील अनेक शेतजमिनी पाणथळ होऊन नापिकीस सामोऱ्या जात आहेत. त्यामुळे कालव्यांचे बंदिस्तीकरण करण्याची शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी होती. यामुळे पाणीटंचाईवर मात करत सिंचनक्षेत्रात वाढ होणार आहे.

त्याचप्रमाणे आढले-डोणे परिसरातील कायमस्वरूपी पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर, पवना नदीवरून उपसा जलसिंचन योजना राबवण्याचीही शिफारस करण्यात आली. या योजनांसाठी आवश्यक विकास आराखडा (DPR) तात्काळ शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीस पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) जाधव, आमदार सुनील शेळके, जलसंपदा विभागाचे सचिव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता तसेच इतर संबंधित अधिकारीही उपस्थित होते.

या निर्णयांमुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, दीर्घकालीन जलसिंचनाच्या दृष्टीने ही बैठक मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!