Homeक्राईमआमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणारा खरा सूत्रधार कोण? – सखोल...

आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणारा खरा सूत्रधार कोण? – सखोल तपासासाठी एसआयटीची स्थापना

आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणारा खरा सूत्रधार कोण? – सखोल तपासासाठी एसआयटीची स्थापना

मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचल्याचे धक्कादायक प्रकरण मागील काळात उघडकीस आले होते. या कटामागील खरा सूत्रधार कोण आहे, तसेच तळेगाव परिसरात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांचा सखोल तपास करण्यासाठी शासनाने विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती केली आहे.

ही एसआयटी पिंपरी-चिंचवड झोन दोनचे उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहणार आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खामगळ, तसेच पोलीस हवालदार अंकुश लांडे, सचिन बेंबाळे आणि सुनील सगर यांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकरणातील सात आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून ९ पिस्तूल, ४२ जिवंत काडतुसे आणि कोयते जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेले आरोपी हे पुणे, जालना आणि मध्य प्रदेश येथील कुख्यात गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या आरोपींवर खून, खंडणी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सुरुवातीला पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून चार पिस्तूल जप्त केली. त्यानंतर तिघांना अटक करत आणखी पाच पिस्तूल आणि काडतुसे हस्तगत केली. शेवटी या टोळीला फंडिंग करणाऱ्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली.

पोलिस तपासानुसार, हे आरोपी मध्य प्रदेशात जाऊन, उत्तर प्रदेशमधील देवराज या कुख्यात गुन्हेगारामार्फत शस्त्रसाठा खरेदी करून आणत असतात

या टोळीतील काही गुन्हेगार जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती. या गंभीर पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी ४ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करून या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती.

तेव्हा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात आश्वासन दिले होते की, “या कटाची सखोल चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल.”

आता या नव्याने स्थापन झालेल्या विशेष तपास पथकावर या कटामागील खरा सूत्रधार कोण हे उघडकीस आणण्याची जबाबदारी आहे. सुनील शेळके यांच्या सुरक्षेसाठी हे पथक कसे काम करते आणि गुन्हेगारी साखळीतील मोठे मास्टरमाइंड समोर येतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

तळेगाव दाभाडे | प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!