Homeसामाजिकइंदोरी – वाड्यावस्त्यांवर प्रशांत दादा भागवत यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

इंदोरी – वाड्यावस्त्यांवर प्रशांत दादा भागवत यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

इंदोरी – वाड्यावस्त्यांवर प्रशांत दादा भागवत यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

राजपुरी-जांभूळ, साते मोहितेवाडी, ब्राह्मणवाडी येथे गणेश मंडळांच्या भेटीदरम्यान जल्लोषात स्वागत

मावळ तालुका – जिल्हा परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांचा मावळातील विविध वाड्यावस्त्यांवरील दौरा उत्साहात सुरू आहे. नुकत्याच झालेल्या दौर्‍यात राजपुरी-जांभूळ, साते मोहितेवाडी आणि ब्राह्मणवाडी या गावांमध्ये ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

गावागावात फटाक्यांच्या आतषबाजीसह घोषणाबाजी करत तरुणांनी दादांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक गणेश मंडळांच्या वतीने पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. या जल्लोषामुळे वातावरणात निवडणुकीपूर्वीच राजकीय चैतन्य पसरले.

या भेटीदरम्यान प्रशांत दादा भागवत यांच्यासोबत नवनाथ पडवळ, रवी कटलक, संतोष जांभूळकर, जालिंदर शेटे, प्रकाश अगाळमे, विठ्ठल मोहिते, रामदास शिंदे, संकेत शिंदे, भानुदास शिंदे, सरपंच शशिकांत शिंदे, तुषार आगळमे, सचिन खाणेकर, चंद्रशेखर नवघणे, संतोष काकरे, अॅड. प्रणव गाडे, रामेश्वर नवघणे, जतिंद्र बोर्हाडे, कुणाल बोर्हाडे, अमोल पोटवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक ग्रामस्थांनी बोलताना सांगितले की, “प्रशांत दादा भागवत यांचा साधा, जमिनीवरचा स्वभाव आणि युवकांसाठीची सकारात्मक विचारसरणी यामुळे त्यांना गावागावातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ग्रामविकासासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि दादांच्या रूपाने हे नेतृत्व आम्हाला लाभणार आहे.”

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत दादा भागवत यांचा ग्रामदौरा अधिक वेग घेत असून, गावोगाव मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांची ताकद वाढवत आहे. आगामी निवडणुकीत या जनसमर्थनाचे रूपांतर दणदणीत यशात होईल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!