Homeमहत्त्वाचेइंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज  आमदार सुनील शेळके यांची सरकारकडे ठोस...

इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज  आमदार सुनील शेळके यांची सरकारकडे ठोस उपायांची मागणी

मुंबई, २ जुलै – मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांनी आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न ठामपणे मांडत सरकारला जाब विचारला. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इंद्रायणी तांदळाच्या लागवडीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचा तुटवडा गंभीर होत चालल्याने त्यांनी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.

मावळमध्ये सुमारे १२,८६५ हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणी तांदळाची लागवड केली जाते. मात्र, या वर्षी उच्च प्रतीच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी विद्यापीठाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही, असा आरोप करत शेळके यांनी शासनाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली.

“राज्याबाहेर बियाण्यांची विक्री करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. हे थांबवायला हवं. शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात बियाणे मिळणे हे त्यांचा हक्क आहे. यासाठी सशक्त यंत्रणा उभारायला हवी,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

त्यांनी पुढे अशी मागणी केली की,

* बियाण्यांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी कार्यवाही केली जावी.

* स्थानिक कृषी संस्था आणि सहकारी संघटनांना थेट बियाणे पुरवठा करावा.

* जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत वेळेत व विश्वासार्ह बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित करता येईल.

शेतकऱ्यांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करत, “शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित करणं हीच खरी जबाबदारी आहे,” असे मत शेळके यांनी अधिवेशनात ठासून मांडले.

शेळके यांनी यापूर्वीही सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!