वडगाव मावळ (ता. मावळ, जि. पुणे) | दि. २५ एप्रिल २०२६
केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत मंजूर निधीतून ही कामे हाती घेण्यात आली असून, आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्षा अबोलीताई मयूर ढोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. नगरसेवक पंढरीनाथ ढोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामांना गती मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शुक्रवार (दि. २४/०४/२०२६) रोजी सकाळी ९.३० वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. नगरसेविका पुनमताई भोसले यांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, नगरसेवक अजय भवार, नगरसेवक अजय म्हाळसकर, नगरसेवक गणेश म्हाळसकर, नगरसेविका सुनिताताई ढोरे, नगरसेविका वैशालीताई सोनवणे तसेच विकी भोसले, गौतम सोनवणे, अनिल गुरव, गणेश ढोरे, अर्पण ढोरे आदी मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अंतर्गत खालील प्रमुख विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला:
प्रभाग क्रमांक १ मधील श्री. आप्पा कदम यांच्या घरापासून अर्पण ढोरे पोल्ट्री ते बाबर यांच्या निवासस्थानापर्यंत रस्ता डांबरीकरण व रुंदीकरण
श्री. जगताप यांच्या घरापासून सांगवी रोडपर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण
श्री. विकी भोसले यांच्या घरापासून सांगवी रस्त्यापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण
इंद्रायणी अपार्टमेंट ते नंदाताई ढोरे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण
मातोश्री बिल्डिंग, माळी निवासस्थान, गुरुकृपा बिल्डिंग ते सांगवी रोडपर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण
या विकासकामांमुळे केशवनगर परिसरातील रस्त्यांची अवस्था सुधारून नागरिकांना दळणवळणाची सुविधा अधिक सुलभ होणार आहे. तसेच पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातूनही मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी संबंधित मान्यवरांनी विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.






















