क्रिकेटपटू शैलेश वहिले यांना ‘वेहेरगाव क्रिकेटर’ पुरस्कार
वडगांव मावळ : अष्टविनायक ग्रुप व वेहेरगाव ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमी यांच्या पुढाकाराने राष्ट्रीयखेळाडू शैलेश पोपटराव वहिले यांचा वेहेरगाव क्रिकेटरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तब्बल सात दिवस चाललेले वेहेरगाव प्रीमियर लीग या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये वहिले यांचा सत्कार करण्यात आला.
मावळ तालुक्यातून आपला सहकारी शैलेश वहिले यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरभ गांगुली, स्टीव्ह स्मिथ, प्रवीण आमरे, ॲलन डोनाल्ड, रोबिन उत्तपा, मनीष पांडे, आशिष नेहरा यांच्या सोबत आयपीएल मध्ये सराव करण्याची संधी मिळाली असता व परदेशी दौऱ्यात साऊथ आफ्रिका ‘अ’संघासोबत खेळण्याची संधी मिळाली असता. त्यांनी आजवर वहिले यांनी प्रशांत वहिले क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धां खेळण्याच्या संधी उपलब्ध करून दिली तसेच त्यांना राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज समाजभूषण या पुरस्काराने औरंगाबाद येथे सन्मानित करण्यात आले होते.
वेहेरगाव क्रिकेटरत्न हा पुरस्कार देताना संजय देवकर, कैलास पडवळ, बबन माने, मंगेश देशमुख, अनिल गायकवाड, चंद्रकांत देवकर संतोष देवकर,शंकर बोरकर, संदीप देवकर,सुनील गायकवाड व सर्व वेहेरगाव ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला तसेच यांचे नियोजन गणेश पवार, पांडुरंग बोत्रे, विशाल माने, तानाजी कुटे, रंगनाथ पडवळ, संदीप देशमुख यांनी केले. व सूत्रसंचालन अशोक कुटे यांनी केले तर सोमनाथ बोत्रे यांनी आभार मानले.



















