Homeक्राईमगँगस्टर रवी पुजारी च्या मावळ मधील शूटरला पिंपरी पोलिसांनी केली अटक

गँगस्टर रवी पुजारी च्या मावळ मधील शूटरला पिंपरी पोलिसांनी केली अटक

गँगस्टर रवी पुजारी च्या मावळ मधील शूटरला पिंपरी पोलिसांनी केली अटक

पिंपरी : येथे एका व्यावसायिक तरुणावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. हा आरोपी कुख्यात गुन्हेगार रवी पुजारी याच्या टोळीचा सदस्य असल्याचे तपासात समोर आले आहे. या आरोपीने यापूर्वी सहा वेळा गोळीबार केला असून बांधकाम व्यावसायिकांना टार्गेट करण्याचा त्याचा गुन्हेगारी पॅटर्न आहे.

चिंचवड परिसरातून मोटारसायकल चोरी करून त्याने पिंपरीत येथे गुन्हा केला होता. पैशाची चणचण भासल्याने त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. रविंद्र भाऊसाहेब घारे (४०, रा. ताम्हाणे वस्ती, टॉवर लाईन, चिखली, मुळगाव ओझर्डे, मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेला आरोपी “दस वाला फ्रुटी दे” असे म्हणत पिंपरी येथील दुकानात घुसला. व्यापारी तरुण फ्रिजमधून फ्रुटी देत असताना रवींद्र याने तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. साखळी न तुटल्याने आरोपीने पिस्तूल दाखवत धमकावले आणि पुन्हा साखळी ओढली. अर्धी साखळी मिळाल्यानंतर उर्वरित मिळवण्यासाठी त्याने पिस्तूलने तरुणावर गोळी झाडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला.

या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने तब्बल ७०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीने हेल्मेट, रेनकोट घालून तसेच मोबाईल न वापरता पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही शरीरयष्टीवरून ओळख पटवत ६ ऑगस्ट रोजी चिखली येथून आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या तपासात अनेक मोठे खुलासे झाले आहेत. आरोपी घारे हा रवी पुजारी व सुरेश पुजारी टोळीचा सदस्य असून सुपारी घेऊन खंडणी, खून, जबरी चोरी करणारा शार्पशूटर आहे.

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो फरार होता. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, वाहनचोरी व गोळीबार असे २५ गंभीर गुन्हे नोंद आहेत.अटकेनंतर पोलिसांनी त्याच्याकडून १० ग्रॅम सोन्याची चैन, एक देशी पिस्तूल, ११ जिवंत काडतुसे, दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे चिंचवड, एमआयडीसी भोसरी व वडगाव मावळ येथील वाहनचोरीचे आणखी तीन गुन्हे उघड झाले आहेत.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक दतात्रय गुळीग, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर, पोलीस अंमलदार महेश खांडे, सोमनाथ मोरे, मोहसीन आत्तार, अमोल गोरे, विशाल गायकवाड, चंद्रकांत गडदे, नितीन उमरजकर, गणेश सावंत, सुमित देवकर, पवन वाजे, समीर रासकर, अमर कदम, नितीन लोखंडे, विनोर वीर, गणेश हिंगे, प्रवीण कांबळे, ज्ञानेश्वर कोलगे, गणेश कोकणे, हर्षद कदम, औदुंबर रोंगे यांनी केली.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!