Homeसामाजिकगणेशोत्सवाच्या मध्यवर्ती पोलीस बांधवांना रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे जेवणाच्या किटचे वाटप

गणेशोत्सवाच्या मध्यवर्ती पोलीस बांधवांना रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे जेवणाच्या किटचे वाटप

गणेशोत्सवाच्या मध्यवर्ती पोलीस बांधवांना रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे जेवणाच्या किटचे वाटप

तळेगाव दाभाडे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रात्री–दिवस बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस बांधवांना रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे जेवणाच्या किटचे वाटप करण्यात आले. समाजाभिमुख कार्याच्या परंपरेतून रोटरी क्लबने हा उपक्रम राबवला.

रोटरी क्लब ऑफ मावळ ही संस्था गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, विद्यार्थ्यांसाठी गणवेश, वह्या–पुस्तकांचे वाटप, ‘गुड टच – बॅड टच’ या विषयांवरील मार्गदर्शनपर व्याख्यानं, बौद्धिक विकासासाठी ‘रायला’ शिबिर, वृक्षारोपण, गोदान असे विविध उपक्रम याआधीही राबविले आहेत. या सातत्यपूर्ण उपक्रमांतून पोलीस बांधवांना वेळोवेळी सहकार्य करणे ही परंपराच क्लबने जोपासली आहे.

विसर्जन मिरवणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी–चिंचवड पोलीस आयुक्तालय, राज्य राखीव पोलीस दल व होमगार्ड यांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती. तळेगाव दाभाडे व सोमाटणे परिसरात एकूण २२५ पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात होते. या सर्व कर्मचाऱ्यांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी क्लब ऑफ मावळने केली.

या उपक्रमाबाबत क्लबच्या सचिव तथा ज्येष्ठ पत्रकार रेश्मा फडतरे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “पोलीस बांधव विसर्जन मिरवणुकीत अहोरात्र दक्षतेने काम करतात. त्यांच्या सेवाभावासाठी हा छोटासा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

क्लबच्या या सामाजिक कार्याचे कौतुक पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड व सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी केले. या वेळी क्लबचे संस्थापक मनोज ढमाले, अध्यक्ष विशाल सांगडे, सचिव रेश्मा फडतरे, माजी अध्यक्ष ॲड. दीपक चव्हाण, सदस्य अमोल नरवडे, नवनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी डॉ. रवींद्र पंडित यांचे विशेष सहकार्य लाभले

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे 📞 9921807011

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!