Homeसामाजिकजिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत दादा भागवत यांना महिलांचा मोठा प्रतिसाद

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत दादा भागवत यांना महिलांचा मोठा प्रतिसाद

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत दादा भागवत यांना महिलांचा मोठा प्रतिसाद

ब्राह्मणवाडी (साते) येथे ‘मनोरंजन संध्या 2025’ ला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

साते (ता. मावळ): मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी (साते) येथे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या वतीने आयोजित ‘मनोरंजन संध्या 2025’ हा सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विशेषतः महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गावागावातील महिलांनी पारंपरिक व आधुनिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पारंपरिक पोशाख, गीत-नृत्य, तसेच खेळांमधून महिलांनी आपली कला आणि आत्मविश्वास सादर केला. कार्यक्रमात पुष्पलता बोऱ्हाडे यांनी प्रथम क्रमांक, माधुरी नवघणे यांनी द्वितीय क्रमांक, तर रेखा विनोदे यांनी तृतीय क्रमांक पटकावून आपला ठसा उमटवला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुका अध्यक्षा सुवर्णा ताई राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा पुष्पा ताई घोजगे, मा. सरपंच वर्षा ताई नवघणे, मा. उपसरपंच संध्या ताई शेळके, तसेच वंदना शिंदे, अश्विनी विनोदे, कविता विनोदे, विद्या शेवकर, सोनल सुर्यवंशी यांच्यासह गावातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले की,

“प्रशांत दादा भागवत यांनी नेहमीच गावागावातील महिलांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत.”

या मनोरंजन संध्येमुळे मावळातील महिलांची एकजूट आणि राजकीय जागरूकता अधोरेखित झाली असून, जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने महिलांचे पाठबळ हेच प्रशांत दादा भागवत यांच्या विजयाचे मुख्य बळ ठरणार असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!