Homeसामाजिकजिल्हा परिषद शाळा चंदनवाडी ठाकर वस्ती येथे ११० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी ठाकर वस्ती येथे ११० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी ठाकर वस्ती येथे ११० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

चांदखेड (ता. मावळ) : ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांना आरोग्यदायी आयुष्य मिळावे यासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड, इनरव्हील क्लब ऑफ मावळ शक्ती व एम.आय.एम.इ.आर. वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी ठाकर वस्ती येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात अंगणवाडी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची एनिमिया, ब्लड ग्रुप, बालरोग, दंतरोग, नेत्ररोग, त्वचारोग, कान-नाक-घसा तपासणी तसेच रक्त तपासणी, जंत तपासणी इत्यादी आरोग्य चाचण्या करून मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रगीताने करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष भीमराव कोळी, निगडी प्राईडच्या अध्यक्षा डाॅ. कमलजीत कौर, रोटरी निगडीचे माजी अध्यक्ष हरबिदर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

वैद्यकीय अधीक्षक दर्पण महेश गौरी यांनी सांगितले की, “ज्या विद्यार्थ्यांना गंभीर आरोग्य समस्या आढळतील त्यांना हॉस्पिटलचे कार्ड देऊन तळेगाव ग्रामीण रुग्णालयात विनामूल्य भरती करून त्यांची सविस्तर तपासणी व आवश्यक उपचार करण्यात येतील.”

प्रदेशाध्यक्ष भीमराव कोळी यांनी यावेळी आश्वासन दिले की, “आदिवासी समाजाच्या आरोग्य, शिक्षण आणि विकासासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही नेहमी देऊ.”

उपस्थित डॉक्टरांच्या टीमने अंगणवाडीतील बालकांना पोषक आहार कसा द्यावा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उत्साहाने सहकार्य केले.

या शिबिराच्या आयोजनात मावळ शक्तीच्या सचिव सुरैया शेख, छाया साळुखे, रेखा बिरादे, मोहिनी काळे, प्रतीक्षा देशपांडे, अजिनाथ ओगले, बाबा कदम आदींनी पुढाकार घेतला. तर वैद्यकीय सेवेत डाॅ. प्राण्या समुले, डाॅ. शोभा इनामदार, डाॅ. अजिलीना, डाॅ. अथर्व नांगरे, डाॅ. अनुजा कांबळे, डाॅ. प्राची जोशी, डाॅ. भारती पटले, डाॅ. महिपती राजपूत, डाॅ. प्रथमेश शिकर या डॉक्टरांसह अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महेश्वरी तरगल्ली, वैशाली बोरकर, अश्विनी वनारसे, सचिन गायकवाड, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ठाकर वस्तीतील नागरिक यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले.

शिबिराच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. डॉक्टरांच्या टीमचा सत्कार करून अल्पोपहार देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विकास रासकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन मावळ शक्तीच्या खजिनदार राजश्री नाईकरे यांनी मानले.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!