टाकवे बुद्रुक ते श्रीक्षेत्र आळंदी बस सेवा सुरू करावी.मावळ तालुका दिंडी समाजाची मागणी
कान्हे : आंदर मावळ मधील प्रमुख बाजारपेठ असलेल्या टाकवे बुद्रुक येथून श्रीक्षेत्र आळंदी पर्यंत बस सेवा सुरू करावी अशी मागणी मावळ तालुका दिंडी समाजाने केली आहे. या मागणीचे निवेदन पीएमपीएम एल चे व्यवस्थापक नारायण कर्डे यांना देण्यात आले आहे.
या संदर्भात बोलताना मावळ तालुका दिंडी समाजाचे सेक्रेटरी नारायण ठाकर व टाकवे सोसायटीचे अध्यक्ष राजू शिंदे म्हणाले की टाकवे ते श्रीक्षेत्र आळंदी ही बस सेवा सुरू झाल्यास वारकरी, कामगार, विद्यार्थी, व्यवसायिक यांच्यासाठी सुविधा निर्माण होणार आहे.
हि बस सेवा टाकवे बुद्रुक येथून कान्हे फाटा, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, इंदोरी, देहू मार्गाने श्रीक्षेत्र आळंदी पर्यंत न्यावी अशी मावळ तालुका दिंडी समाजाची मागणी आहे. पीएमपीएम एल चे व्यवस्थापक नारायण कर्डै यांनी परिसरातील मार्गाची पाहणी करून बस सेवा सुरू करण्याबाबत आश्वासन दिले आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















