डिजे आणि लेझर लाईटचा वापर टाळून गणेशोत्सव साजरा करावा. गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन
तळेगाव दाभाडे : येथील सुशीला मंगल कार्यालयात बुधवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड विभागातील तळेगाव दाभाडे. तळेगाव एमआयडीसी. शिरगाव. देहूरोड आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले की न्यायालयाचे आदेश आणि विसर्जन मिरवणुकांच्या वेळेचे काटेकोर पणे पालन करावे. यंदा डीजे आणि लेझर लाईट चा वापर टाळून गणेश उत्सव साजरा करावा. उत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या रीतसर घ्याव्यात. वाहतुकीस अडथळा होणार नाही असा मजबूत सुरक्षित मंडप उभारावा. सीसीटीव्ही बसवावेत. मिरवणुकीतील देखाव्याची उंची १५ फुटापेक्षा जास्त नसावी. मिरवणुकीच्या दरम्यान पारंपारिक वाद्याचा वापर करावा. मंडपात अग्निरोधक सिलेंडर ठेवावे. आक्षेपार्ह देखावे उभारू नयेत. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांना ओळखपत्र द्यावे. जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये. मंडपामध्ये नेहमी एक कार्यकर्ता सतर्कपणे उपस्थित ठेवावा. दारू अथवा इतर कोणतेही अमली पदार्थ सेवन करून गणेशोत्सव साजरा करू नका .असे आवाहन पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी केले.
देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक रणजीत जाधव, पोलीस निरीक्षक विशाल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बनसुडे, त्यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी व असंख्य गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















