डॉ संजीवनी मुळे यांची महिला ज्योतिर्विद संस्थेच्या अध्यक्षपदी निवड
तळेगाव दाभाडे : येथील मुळे ज्योतिष/ ब्रह्मा वास्तु कन्सल्टन्सी व मुळे वधू वर केंद्राच्या प्रमुख ज्योतिष विद्या वाचस्या डॉ संजीवनी मुळे यांची ज्योतिष विश्वातील महिला ज्योतिर्विद या संस्थेच्या २०२५/२६च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
संजीवनी मुळे या सुप्रसिद्ध ज्योतिर्विद कवयित्री व सामाजिक कार्यकर्ते असून ज्योतिष व वास्तु विषयक क्षेत्रात गेल्या २५ वर्ष त्या कार्यरत आहे. महिला ज्योतिर्विद संस्थेचे संस्थापक व मुख्य सल्लागार डॉ मधुसूदन घाणेकर यांनी त्यांची निवड जाहीर केली तसेच कार्याध्यक्षपदी डॉ रजनी सावदे, उपाध्यक्ष प्राध्यापक स्मिता गिरी, सचिव डॉ सविता महाडिक, कोषाध्यक्ष सुजाता पागे यांची देखील यावेळी निवड जाहीर करण्यात आली.
जून २०२५ अखेर पुण्यात महिला ज्योतिर्विद संस्थेचे १०० वे महिला ज्योतिर्विद अधिवेशन डॉ मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली येण्याचा निर्णय त्या बैठकीत झाला. आगामी वर्षभराच्या काळात ज्योतिष विषयक ६ अधिवेशने तसेच महत्त्वपूर्ण व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार असून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५०व्या जयंतीचे औचित्य साधून आळंदी तसेच काही प्रसिद्ध तीर्थक्षेत्री ज्योतिष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षा डाॅ संजीवनी मुळे यांनी सांगितले. मावळत्या अध्यक्षा सुनिता पागे यांनी आभार मानले. डाॅ संजीवनी मुळे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे
(गणेश नामदेव भेगडे)




















