तळेगाव दाभाडे शहराला आजपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू होणार
तळेगाव दाभाडे: सोमाटणे गावातील ओढ्यालगत असलेली २० इंची मुख्य पाण्याची पाईपलाईन बुधवार दिनांक २१मे २०२५ रोजी फुटल्याने तळेगाव दाभाडे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. शुक्रवार दिनांक २१मे २०२५ रोजी पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून आजपासून शनिवार दिनांक २४मे २०२५ला शहरात टप्प्याटप्प्याने नियमित पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे प्रभारी पाणीपुरवठा अभियंता अभिषेक शिंदे यांनी दिली आहे.
पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन फुटल्याने तळेगाव गाव भाग, मस्करनेस कॉलनी, तुकाराम नगर, कडोलकर कॉलनी, काळोखे वाडी, शांताई नगरी तसेच वडगाव फाटा ते तळेगाव जनरल हॉस्पिटल दरम्यानच्या परिसरात पाण्याचा अपुरा व असमतोल पाणीपुरवठा होत होता.
अपुरा व असमतोल पाणीपुरवठ्याने नागरिकांना हैराण केले होते .अनेक नागरिकांनी पाण्याचा टँकर आणून पाणीसाठा करावा लागत होता. विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाले असून आजपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे




















