तळेगावात डीजे बंदी हटवावी यासाठी बैठकीचे आयोजन
तळेगाव दाभाडे : शहरात डीजे बंदी हटवावी यासाठी शहरातील गणेश मंडळांची महत्वाची बैठक गुरुवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६: वाजता ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात आयोजित करण्यात आली आहे.
या डीजे बंदी बाबत भेगडे तालीम मंडळाचे खजिनदार शुभम लांडे यांनी सांगितले की डीजे बंदीचा आदेश गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही तर तो सगळ्याच प्रकारच्या मिरवणुकींना लागू असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे असे असताना अन्य मिरवणुका जसे की राजकीय मिरवणुका निघतात त्यांना डीजे बंदी नसते का? असा सवाल त्यांनी केला आहे.७० डिसिबल आवाज मर्यादा शासन नियम असताना डीजेला बंदी का. केवळ हिंदू सणालाच डीजे बंदीचे सावट का निर्माण होत.
आहे याकरिता शहरातील सर्व गणेश मंडळांनी विचार विनिमय करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच मावळ तालुका डीजे असोशियन यांनी देखील शासनाच्या नियमात डीजे वाजवण्याची विनंती केली आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















