Homeमहत्त्वाचेतळेगावात वारंवार वीजपुरवठा खंडित

तळेगावात वारंवार वीजपुरवठा खंडित

तळेगावात वारंवार वीजपुरवठा खंडित

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे स्टेशन व गाव भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी आणि वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  प्रगती रूकारी यांनी केली आहे.

त्यापुढे असे म्हणाल्या की गाव व स्टेशन भागामध्ये काही दिवसापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. दरम्यान विविध भागात झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. परंतु या कामाच्या नावाखाली कोणतेही नियोजन किंवा वेळापत्रक न ठरवता कोणत्याही वेळी विजापुरवठा तासंन् तास बंद केला जात आहे.

नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना दिली जात नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाचे प्रमाण जास्त नसताना देखील विज खंडित होण्याचे हे प्रमाण का वाढत आहे? छोटे मोठे लघुउद्योग. ऑनलाइन काम करणारे या सगळ्यांनाच इन्व्हर्टर घेणे शक्य नसते. रात्रीच्या वेळी अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने चोरी व गैरप्रकार होण्याची शक्यता वाढली आहे.

प्रगती रूकारी शेवटी म्हणाल्या की महावितरण कार्यालयामध्ये दूरध्वनीवर संपर्क केला असता तेथील कर्मचारी व अभियंते प्रतिसाद देत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन गाव व स्टेशन भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!