Homeमहत्त्वाचेतळेगावातील दोन युवक बनले आर्यन मॅन

तळेगावातील दोन युवक बनले आर्यन मॅन

तळेगावातील दोन युवक बनले आर्यन मॅन

तळेगाव दाभाडे : अत्यंत खडतर, संयम, शारीरिक सामर्थ्य आणि मानसिक दृढतेची परमोच्च कसोटी मानल्या जाणाऱ्या आर्यन मॅन स्पर्धेत तळेगाव दाभाडेच्या दोन सुपुत्रांनी अविस्मरणीय यश संपादन केले आहे. २० सप्टेंबर २०२५ रोजी इटलीतील Emilia Romagna येथे पार पडलेल्या या जागतिक स्पर्धेत विशाल चंद्रकांत शेटे व महेश तानाजी भेगडे यांनी आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.

आर्यन मॅन ही स्पर्धा म्हणजे तीन खेळांची अखंड साखळी.

स्विमिंग – ३.८६ किमी

सायकलिंग – १८०.२५ किमी

मॅरेथॉन धावणे – ४२.२ किमी

एकूण २२६ किमीचा प्रवास एका दिवसात पूर्ण करणे हीच या स्पर्धेची खरी कसोटी. जगभरातील खेळाडूंसाठीसुद्धा ही परीक्षा अवघड मानली जाते.

या प्रवासात अनेक संकटांचा सामना करतही विशाल व महेश यांनी हार मानली नाही.

स्विमिंगच्या टप्प्यात उष्णतेमुळे आलेल्या स्नायूंच्या कडकडाटामुळे (Cramps) ३२०० मीटरवर गंभीर अडचण निर्माण झाली. मात्र, इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हा टप्पा पूर्ण केला.

सायकलिंगच्या टप्प्यात १८० किलोमीटरच्या लांब प्रवासात जाळणारा सूर्य, कठीण चढ, आणि वाऱ्याचा वेगवान प्रतिकार यांचा सामना करत steady pacing ठेवले.

मॅरेथॉन टप्प्यात ४२.२ किलोमीटर अंतर पार करताना पोटदुखी व तणावानंतरही “aid station to aid station” अशी रणनीती वापरून त्यांनी Personal Best (PB) गाठला.

फिनिश लाईन पार करताना विशाल शेटे व महेश भेगडे यांनी तिरंगा हातात धरून भारतीय संस्कृतीचे व देशभक्तीचे दर्शन घडविले. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान व आनंद हा केवळ त्यांच्या मेहनतीचा विजय नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण ठरला.

विशाल शेटे यांनी याआधीही दोन वेळा आर्यन मॅन किताब पटकावला आहे. यावेळी त्यांनी hat-trick करत पुन्हा एकदा तळेगावाचे नाव गौरवले.

महेश तानाजी भेगडे यांनी प्रथमच या स्पर्धेत भाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात किताब जिंकत इतिहास रचला.

या दोन्ही खेळाडूंच्या यशामुळे तळेगाव दाभाडे, मावळ आणि संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक संघटना, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून दोघांचे मनापासून अभिनंदन होत आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!