Homeताज्या बातम्यातिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज उत्सवाला वडगाव मावळात भक्तिमय प्रारंभ; पालखी, कुस्त्या व...

तिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज उत्सवाला वडगाव मावळात भक्तिमय प्रारंभ; पालखी, कुस्त्या व बैलगाडा शर्यतींनी रंगली जत्रा

तिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज उत्सवाला वडगाव मावळात भक्तिमय प्रारंभ; पालखी, कुस्त्या व बैलगाडा शर्यतींनी रंगली जत्रा

वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज उत्सवाला गुरुवारी (दि. २) भक्तिभावाच्या वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेपासूनच श्री पोटोबा जोगेश्वरी मंदिरात दर्शनासाठी स्थानिकांसह पुणे जिल्हा व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण वडगाव परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता.

उत्सवानिमित्त पहाटे देवस्थानचे विश्वस्त व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी मातेला अभिषेक घालून उत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महापूजा व महाआरती पार पडली. याचवेळी श्री हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “पोटोबाच्या नावाने चांगभलं” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. दिवसभर छबिना, मानाचे बगाड, मानाच्या काठ्या, भजन स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगले.

शुक्रवारी (दि. ३) सकाळी श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी मातेची पालखी गावातून ग्रामप्रदक्षिणेसाठी काढण्यात आली. बैलगाडीतून नगारा वादन, तसेच आळंदी येथील बाल वारकरी भावन मंडळाच्या टाळ-मृदुंगाच्या गजरात वडगावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. पै. केशवराव ढोरे आखाड्यात जंगी कुस्त्यांचे सामने रंगले. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या पैलवानांनी दमदार कुस्त्या सादर केल्या. विजेत्यांना १ लाख ११ हजार १११ रुपयांची बक्षिसे व चांदीची गदा प्रदान करण्यात आली.

उत्सवानिमित्त आयोजित भजन स्पर्धेत मावळ तालुका व पुणे जिल्ह्यातील भजनी मंडळे तसेच महिला भजनी मंडळांनी उत्साहात सहभाग घेतला.

शनिवारी (दि. ४) भव्य छकडी बैलगाडा शर्यतीत सुमारे २०० बैलगाड्यांनी सहभाग घेत उत्सवाची शोभा वाढवली. सायंकाळी विविध सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमांनी रंगत वाढवली, तर रात्री ९ वाजता विशेष मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला. उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. दरम्यान, पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उत्सवाच्या यशस्वी नियोजनासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र म्हाळसकर, कार्याध्यक्ष अतिश ढोरे, कार्यक्रम प्रमुख बाळासाहेब तुमकर यांच्यासह शेखर वहिले, सुहास विनोदे, गजानन भेगडे, अजय भावार, सुहास वायकर, अनिल कोद्रे, कुलदीप ढोरे, संदीप म्हाळसकर, प्रवीण पटोळे, अतुल राऊत, गणेश अ. ढोरे, संजय दंडेल, भुषण मुथा, तुषार वहिले, विक्की म्हाळसकर, संतोष भिलारे, अनिल ओव्हाळ आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!