Homeसामाजिकनगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या माध्यमातून वडगाव मधील ठाकर समाजातील सुमारे १३...

नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या माध्यमातून वडगाव मधील ठाकर समाजातील सुमारे १३ कुटुंबीयांना जातीच्या दाखल्यांचे वाटप

नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या माध्यमातून वडगाव मधील ठाकर समाजातील सुमारे १३ कुटुंबीयांना जातीच्या दाखल्यांचे वाटप.

मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या माध्यमातून मोरया प्रतिष्ठानच्या सहकार्याने आज वडगाव शहरामधील ठाकर समाजातील सुमारे १३ कुटुंबीयांना वडगाव नगरपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. अबोली मयूर ढोरे, नगरसेवक अजय भवार, नगरसेवक गौतम सोनवणे यांच्या शुभहस्ते जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

या समाजातील कुटुंबीयांचा ताण कमी करण्यासाठी शासकीय स्तरावर आमदार सुनील शेळके जनसंपर्क कार्यालयाच्या सहकार्यातून तसेच मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून या समाजातील बांधवांना आज प्रत्यक्षात जातीचे दाखले दिल्याने खूप वर्षाचा प्रश्न मार्गी लावल्याने आज खरे समाधान भेटल्याची भावना नगराध्यक्षा सौ. अबोली मयूर ढोरे यांनी व्यक्त केली.

या व्यतिरिक्त अजूनही ठाकर समाजातील काही कुटुंबीयांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी शासन स्तरांवर पाठपुरावा सुरू आहे. आज भेटलेल्या दाखल्यांमुळे खूप वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागल्याने या समाजातील गोरगरीब रहिवाशांनी समाधान व्यक्त करत आमदार साहेबांचे आणि मा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांचे विशेष आभार मानले.

वडगाव शहरातील ठाकर, आदिवासी, कातकरी समाजातील अनेक बांधव जातीच्या दाखल्यापासून वंचित असल्याने शैक्षणिक कामांसाठी तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. परंतु ज्यांचे पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते तसेच भूमिहीन होते अशा कुटुंबातील नागरिकांना तसेच त्यांच्या पाल्यांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो व वेळोवेळी दाखला काढण्यासाठी लागणा-या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असतात. या समाजांतील कुटुंबीयांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आमदार सुनिल शेळके जनसंपर्क कार्यालयातील श्री. रुपेशजी सोनुने यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

येणाऱ्या कालावधीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध हितकारक योजना तसेच महिला समाज कल्याण विभाग वडगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी बचत गट स्थापन करणे यांसह अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी नियोजन केले जाईल अशी माहिती नगराध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!