Homeमहत्त्वाचेनविन नेतृत्वाची नांदी; नर्सिंग विद्यार्थ्यांचा गुणगौरव व युवा नेतृत्व प्रशिक्षण सोहळा उत्साहात

नविन नेतृत्वाची नांदी; नर्सिंग विद्यार्थ्यांचा गुणगौरव व युवा नेतृत्व प्रशिक्षण सोहळा उत्साहात

नविन नेतृत्वाची नांदी; नर्सिंग विद्यार्थ्यांचा गुणगौरव व युवा नेतृत्व प्रशिक्षण सोहळा उत्साहात

तळेगाव दाभाडे : समाजघटक म्हणून जबाबदार नागरिक घडविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने आयोजित नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच Youth Leadership Training (नेतृत्व विकास प्रशिक्षण) कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. शिस्तबद्ध नियोजन, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमात प्रमुख प्रशिक्षक म्हणून रो. डॉ. धनश्री काळे यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व विकासाचे मोलाचे धडे दिले. अभ्यासक्रमातील सोप्या व उपयुक्त टिप्स देत शिक्षण घेत असतानाच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग कसा घेता येईल, याचे त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. स्वयंसेवा, संघभावना, वेळेचे नियोजन आणि सामाजिक भान या विषयांवर त्यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शाळांमध्ये घेण्यात आलेल्या हिमोग्लोबिन तपासणी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. सामाजिक आरोग्य उपक्रमांमध्ये नर्सिंग विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन रो. दिपाली शिंदे यांनी केले. त्यांनी रोटरीच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देत युवा पिढीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते सूत्रसंचालन रो. प्रशांत ताये यांनी केले, तर आभार प्रदर्शन रो. प्रदीप टेकवडे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रो. प्रदीप मुंगसे व रो. राकेश गरुड यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रो. दिनेश चिखले, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य तसेच अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर यांची उपस्थिती लाभली.

मार्गदर्शन, गुणगौरव आणि नियोजनबद्ध आयोजनामुळे हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित होतात, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रतिनिधी.गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!