निधन वार्ता
नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब सहादू शिंदे यांचे दुःख निधन
कामशेत : नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब सहादू शिंदे (वय ६० वर्ष) यांचे सोमवार दिनांक ७ जुलै २०२५ रोजी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आज दुपारी ११ वाजता नायगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा तीन विवाहित मुली तीन भाऊ भावजय पुतणे नातवंडे असा परिवार असून. कै भाऊसाहेब शिंदे हे अतिशय शांत व मनमिळाऊ स्वभावाचे तसेच पंचक्रोशीत भजनकरी म्हणून परिचित होते. पत्रकार गणेश भेगडे यांचे ते सासरे होते तर नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संपत शिंदे यांचे ते चुलते होत.



















