Homeमहत्त्वाचेपुणे –बारामती सायकल स्पर्धा सहभागी होण्याचे आवाहन

पुणे –बारामती सायकल स्पर्धा सहभागी होण्याचे आवाहन

पुणे –बारामती सायकल स्पर्धा सहभागी होण्याचे आवाहन

तळेगाव दाभाडे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे यंदाचे नववे वर्ष शनिवार, १९ जुलै रोजी पार पडणार आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, याची माहिती शिक्षण मंडळाचे मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम यांनी दिली.

स्पर्धा राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर विविध गटांमध्ये विभागली आहे. पुणे ते बारामती १२२ कि.मी. अंतरासाठी पुरुष गटातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा होईल. सासवड ते बारामती (८५ कि.मी.) ही एमटीबी सायकल स्पर्धा खुल्या पुरुष गटासाठी असून, माळेगाव ते बारामती (१५ कि.मी.) हे अंतर महिलांसाठी राष्ट्रीय स्तरावर ठेवण्यात आले आहे. तसेच पोलीस व राज्यशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा स्वतंत्र गट ठेवण्यात आला आहे.

या स्पर्धेत देशभरातून ४०० ते ४५० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलपटूंचा सहभाग अपेक्षित आहे, तर राज्यस्तरीय गटात ३०० ते ३५० स्पर्धक सहभागी होतील. दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, अंदमान-निकोबार, चंदीगड यासह विविध राज्यांतील तसेच सेनादल, रेल्वे आणि एअर फोर्सच्या खेळाडूंचा सहभाग असणार आहे.

एकूण सहा लाख रुपयांचे रोख बक्षिसे विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहेत. दिवे घाट प्रथम पार करणाऱ्या खेळाडूला ‘घाटाचा राजा’ हा पुरस्कार देण्यात येईल. प्रत्येक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्हासह गौरवले जाईल.

गतवर्षी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत एअर फोर्सच्या मनजित सिंगने २.३३.५५ वेळेत प्रथम क्रमांक मिळवला होता. राज्यस्तरावर कोल्हापूरच्या सिद्देश पाटीलने २.३७.३१ वेळेत विजय मिळवला होता. ‘घाटाचा राजा’ किताब सूर्या थत्तु (राष्ट्रीय) व सिद्देश पाटील (राज्य) यांनी पटकावला होता.

स्पर्धेसोबतच शनिवारवाडा ते हडपसर दरम्यान एक भव्य जनजागृती सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. आरोग्य, वाहतूक, पर्यावरण आणि स्वच्छता या विषयांवर जनजागृती करण्याचा उद्देश असून, यामध्ये ३ हजार ते ३५०० विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, ज्येष्ठ आणि कार्यकर्त्यांचा सहभाग अपेक्षित आहे.

या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ शनिवारवाडा येथे सकाळी ८ वाजता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ,विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या उपस्थितीत होणार आहे. मुख्य स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे उद्योजक सतिश मगर, आंतरराष्ट्रीय सायकलपटू दशरथ जाधव व आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते होईल.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दुपारी २.३० वाजता बारामतीतील ग.दि.मा. सभागृहात होणार असून, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुनेत्रा पवार, डॉ. संजीव सोनावणे यांच्या हस्ते पार पडेल. खासदार सुप्रिया सुळे व इतर मान्यवरही या समारंभास उपस्थित राहतील.

या भव्य उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार अ‍ॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार व सहसचिव ए.एम. जाधव यांनी केले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!