Homeमहत्त्वाचेप्रांताधिकारी डॉ यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनाची...

प्रांताधिकारी डॉ यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली

प्रांताधिकारी डॉ यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली

देहूगाव : श्री क्षेत्र देहू येथून पंढरपूर कडे १८ जून २०२५ रोजी प्रस्थान करणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४०व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू गावात शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी नियोजन आढावा बैठक पार पडली. सदरील बैठक मुख्य मंदिर परिसरातील दर्शन बारी सभागृहात पार पडली. भाविक आणि वारकऱ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने विविध शासकीय यंत्रणा. मंदिर संस्थान. आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

या बैठकीत विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषत देहू देहूरोड पालखी मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवणे. येलवाडी देहू फाटा हा मार्ग दुरुस्ती करणे. अनगड शहा वली दर्ग्याजवळील कापूर ओढा पुलावरील तुटलेले कठडे दुरुस्त करणे. तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर उपाययोजना करणे. शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे. या बाबी बैठकीत मांडण्यात आल्या.

वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी ३ रोहित्राची व्यवस्था करणे.५०० मीटर केबल टाकणे. आणि सर्व डीपी सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन महावितरणचे संतोष झोडगे यांनी दिले. तसेच वीज खंडित झाल्यास पाणीपुरवठ्यावर होणाऱ्या परिणामाची गंभीर दखल घेत डॉ यशवंत माने यांनी आवश्यक दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.डाॅ माने यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय विभागांनी एकत्रितपणे पुढील कामकाज राबवण्याच्या सूचना दिल्या असून यामध्ये रस्त्यावरील खड्डे रुजविणे, मुरूम टाकणे, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, आरोग्य व औषध उपचार सेवा, वाहतूक नियोजन, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, नियंत्रण कक्ष स्थापन करणे, आणि मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ यशवंत माने होते. यावेळी पिंपरी चिंचवडचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख, श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे, प्रभारी मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या नियोजन बैठकीत श्री क्षेत्र देहूच्या पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागात समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रतिनिधी. गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!