Homeसामाजिकभाजपामध्ये संतोष दाभाडे (पाटील) हे विश्वासार्ह व चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व – आमदार श्रीकांत...

भाजपामध्ये संतोष दाभाडे (पाटील) हे विश्वासार्ह व चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व – आमदार श्रीकांत भारतीय

भाजपामध्ये संतोष दाभाडे (पाटील) हे विश्वासार्ह व चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व – आमदार श्रीकांत भारतीय

तळेगाव दाभाडे : शहरातील ईशा हॉटेलमध्ये सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान यांच्यावतीने शहर व परिसरातील तब्बल ३५० शिक्षकांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या भव्य सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून आमदार श्रीकांत भारतीय यांनी आपल्या विचारांमधून शिक्षकांना व समाजाला दिशा देणारे मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की, “भाजपामध्ये संतोष दाभाडे पाटील हे विश्वासार्ह व चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व आहे. बाजारात टॅग लावून क्वाॅलिटी विकत घेता येते, पण क्षमताशक्ती (Capacity) आणि चारित्र्य (Character) हे फक्त संवेदनशीलतेतून घडवावे लागते. आजच्या सार्वजनिक जीवनात ही बाब दुर्मिळ झाली आहे. मात्र, संतोष दाभाडे पाटील यांच्यामध्ये ही अपूर्व गुणवैशिष्ट्ये असल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत चिंता करण्याची गरज नाही.”

शिक्षण क्षेत्रावर भाष्य करताना आमदार भारतीय म्हणाले की, “विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे यासाठी शिक्षकांनी स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करून काळाच्या गरजेनुसार शिक्षण पद्धतीत सुधारणा करावी. विद्यार्थ्यांची संवेदनशील पिढी निर्माण करणे हे शिक्षकांचे सर्वात मोठे कर्तव्य आहे.”

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे (पाटील), श्रीमंत सरदार अंजलीराजे दाभाडे, श्रीमंत सरदार वृषालीराजे दाभाडे, माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे, सुरेश धोत्रे, गिरीष खेर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब दाभाडे, रजनीताई ठाकूर, माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल, चिराग खांडगे, सुरेश झेंड, सुरेश दाभाडे, माजी नगरसेवक सचिन टकले, माजी नगरसेविका नीलिमा दाभाडे, शोभा भेगडे, संदीप जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अॅड. विनय दाभाडे यांनी प्रास्ताविक केले, तर संस्थापक संतोष दाभाडे (पाटील) यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साप्ताहिक अंबर चे सहसंपादक प्रशांत पुराणिक यांनी केले. कार्याध्यक्ष आनंद दाभाडे यांनी आभार मानून समारोप केला.

या कार्यक्रमाला तळेगाव शहर व परिसरातील शिक्षक, नागरिक तसेच प्रतिष्ठानचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे) ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!