Homeमहत्त्वाचेमतदार जागृती मोहिमेत महिलांची अग्रणी भूमिका. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा उपक्रम

मतदार जागृती मोहिमेत महिलांची अग्रणी भूमिका. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा उपक्रम

मतदार जागृती मोहिमेत महिलांची अग्रणी भूमिका. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा उपक्रम

तळेगाव दाभाडे :नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी SVEEP उपक्रमांतर्गत विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जात आहेत. नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष जनजागृती अभियान हाती घेण्यात आले असून, या उपक्रमात दीनदयाळ अंत्योदय योजना–राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) अंतर्गत स्थापन झालेल्या बचत गटांचा सक्रिय सहभाग दिसून आला.

बचत गटांमध्ये मतदानाविषयी जनजागृती, संवाद उपक्रम तसेच लोकशाही मजबुतीसाठी आवश्यक असलेल्या प्रतिज्ञेचा शपथविधी घेण्यात आला. या अभियानामध्ये म्हाळस्करवाडी येथील रिद्धी-सिद्धी बचत गट आणि विठ्ठलवाडी येथील रुक्मिणी बचत गटातील महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. याशिवाय वतन नगर परिसरातील गौरा, सृष्टी, सुकन्या, जय श्रीराम आणि प्रार्थना या बचत गटांनीही उपस्थित राहून मतदार जागृतीच्या संदेशाचा मजबूत प्रसार केला.

अभियानाचे आयोजन निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर आणि उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी महिलांच्या सहभागाचे कौतुक करताना लोकशाही प्रक्रियेत सर्वसमावेशक सहभागाची गरज अधोरेखित केली.

या कार्यक्रमाला NULM प्रमुख विभा वाणी, स्नेहल जगताप, जयश्री बाठे तसेच महाशक्ती शहर स्तर संघाच्या सचिव दया लायगुडे यांची उपस्थिती लाभली. मार्गदर्शक मंडळाने मतदानाच्या दिवशी शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

या माध्यमातून तळेगाव दाभाडे परिसरात महिलांच्या सहभागातून मतदार जागृतीचा मूल्यवान संदेश समाजापर्यंत पोहोचत असून, आगामी निवडणुकीत सुजाण आणि सक्रीय मतदानाची आशा व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!