Homeसामाजिकमला घडविण्यात शिक्षकांचा मोठा हातभार – अभिनेते भूषण प्रधान

मला घडविण्यात शिक्षकांचा मोठा हातभार – अभिनेते भूषण प्रधान

मला घडविण्यात शिक्षकांचा मोठा हातभार – अभिनेते भूषण प्रधान

तळेगाव दाभाडे :
“इंद्रायणी विद्यामंदिर या नावातच विद्यामंदिर आहे आणि त्या मंदिरातील देव म्हणजे तुम्ही शिक्षक. माझ्या आयुष्यात जे काही साध्य केले आहे, त्यामागे आई-वडिलांसोबतच शिक्षकांचा मोठा हातभार आहे,” अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते भूषण प्रधान यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने आयोजित शिक्षक दिन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे होते.

शिक्षकांचे मोल अधोरेखित

भूषण प्रधान यांनी आपल्या मनोगतात सांगितले,

“पहिली शिक्षिका म्हणजे आई असते. शिक्षकांच्या कौतुकाच्या थापेमुळेच मी शिस्तप्रिय झालो. आमच्या मुख्याध्यापिकेमुळेच मी अभिनय क्षेत्रात आलो. कॉलेजने व्यक्तिमत्त्व घडवले आणि आज मी स्ट्रेस फ्री राहू शकतो, त्याचे श्रेय शिक्षकांनाच आहे.

लहानमोठ्यांचा आदर कसा ठेवायचा, हे शिक्षकांकडूनच शिकता आले.

फिटनेससोबतच शिकण्याची आवड कायम ठेवणे आवश्यक आहे.

शिक्षक-विद्यार्थी बंध आता कमी होत चालला आहे, हे चिंतेचे कारण आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना मला शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांनीच आधार दिला.”

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, संचालक संदीप काकडे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, यशोदा महादेव काकडे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. साहेबराव पाटील, उपप्राचार्य एस. पी. भोसले, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘भूक आणि भाकरी’ पुस्तक प्रकाशन

प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी स्वागत व प्रास्ताविकात संस्थेच्या प्रवासाचा आढावा घेतला. तसेच शिक्षक दिनाचे खरे फलित म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, रवींद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर विचारवंतांनी घडवलेल्या शिक्षण तत्त्वज्ञानाचे आकलन करणे असे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. मलघे लिखित ‘भूक आणि भाकरी’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

अध्यक्षीय मनोगत

आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यवाह चंद्रकांत शेटे म्हणाले,
“इंद्रायणी महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे. त्या काळापासून आजपर्यंत संस्थेने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. संस्थेला मोठे करण्यात शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांची दूरदृष्टी आणि पदाधिकाऱ्यांचे सहकार्य यामुळे संस्था भविष्यात आणखी उंच भरारी घेईल.”

कार्यक्रमाचे संचालन

अतिथी परिचय : प्रा. सत्यजित खांडगे

सूत्रसंचालन : प्रा. दीप्ती कन्हेरीकर व प्राची भेगडे

आभार प्रदर्शन : प्रा. एस. पी. भोसले

या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभागाचे प्रा. कृष्णा मिटकर, प्रा. आर. आर. डोके यांचेही सहकार्य लाभले.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!