महाराष्ट्रातील प्रथम व एकमेव असा शिवचरित्र पारायण सोहळा नवरात्री उत्सवात यशस्वीरित्या संपन्न
तळेगाव दाभाडे : शिवशाही परिवार तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने शिवचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याचे हे सहावे वर्ष ठरले. सलग पाच दिवस संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत शिवचरित्राचे वाचन व त्यानंतर इतिहासकार व समाज प्रबोधकांची व्याख्याने अशा पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दिनांक २४ ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हा सोहळा पार पडला.
पहिला दिवस : कडलक परिवार, नवलाख उंब्रे
दुसरा दिवस : दळवी परिवार, लैटीस सोसायटी
तिसरा दिवस : आगळे परिवार, काळोखे वाडी
चौथा दिवस : तांबे परिवार, एम्पायर स्क्वेअर, चिंचवड
पाचवा दिवस (समारोप) : बोराडे परिवार, राजगुरव कॉलनी, तळेगाव दाभाडे
या सोहळ्याला ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, इतिहास संशोधक सुधीरजी थोरात यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवशाही परिवाराचे संस्थापक डॉ. प्रमोद बोराडे व डॉ. प्रिया बोराडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की :
“हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपली मंदिरे, धर्म, अध्यात्म, संस्कृती व परंपरा टिकून आहे. नवरात्रोत्सवात देवीची उपासना करत असताना महाराजांचे चरित्र वाचणे आणि समजून घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आजचा वर्तमान आणि उद्याचा भविष्यकाळ सुरक्षित, वैभवी करण्यासाठी शिवशाही परिवार तर्फे मोफत पारायण आणि व्याख्याने गावोगावी नेली जात आहेत.”
कार्यक्रमाची सांगता रोज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने करण्यात आली. यंदा पारायणात विशेषतः “जन्म ते राज्याभिषेक” या कालखंडावर आधारित वाचन झाले.
शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अनेक मान्यवरांनी या सोहळ्यादरम्यान मत व्यक्त केले की –
“नवी पिढी सक्षम, निर्व्यसनी, कर्तृत्ववान व चारित्र्यसंपन्न घडविण्यासाठी शिवचरित्र हा एकमेव पर्याय आहे.”
शिवशाही परिवार तर्फे प्रत्येक महिन्याला एक दुर्गाभ्यास सहल आयोजित केली जाते. या उपक्रमामुळे युवकांमध्ये इतिहास, पराक्रम आणि स्वाभिमानाची जाणीव दृढ होत आहे.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)




















