Homeसामाजिकमहिला पोलीस अधिकारी ज्योती सोनवणे यांना कर्तुत्ववान महिला पुरस्काराने सन्मान

महिला पोलीस अधिकारी ज्योती सोनवणे यांना कर्तुत्ववान महिला पुरस्काराने सन्मान

महिला पोलीस अधिकारी ज्योती सोनवणे यांना कर्तुत्ववान महिला पुरस्काराने सन्मान

तळेगाव दाभाडे : शहरातील मानाचा पाचवा गणपती व नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या श्री गणेश तरुण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात पोलीस स्टेशनच्या वाहतूक पोलीस अंमलदार ज्योती सोनवणे यांना यंदाचा “श्री सिद्ध गणेश कर्तृत्ववान महिला पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

सुशीला मंगल कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला.

मंडळाचा गौरवशाली वारसा

सन १९०२ मध्ये स्थापन झालेले श्री गणेश तरुण मंडळ यंदा आपल्या १२३ व्या वर्षात पदार्पण करत असून धार्मिक व सामाजिक उपक्रमांसोबतच समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा गौरव करण्याची परंपरा मंडळाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू केली आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राधिका हेरेकर, उपाध्यक्ष सिद्धू जाधव, प्रशांत खर्डेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल फाकटकर, शाहीर-कवि दत्तात्रय मेढी, केदार मेढी, प्रतीक मेहता, महेश सोनपावले, प्रदीप कदम (मॅनेजर, पुना गाडगीळ अँड सन्स), व्याख्याते श्रीकांत मेढी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, उद्योजक राजू शिंदे, तसेच सामाजिक कार्यकर्ते व ज्योती सोनवणे यांचे वडील भिकाजी सदावर्ते यांच्यासह शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कौतुकाची सरबत्ती

ज्योती सोनवणे यांना पुरस्काराने सन्मानित होताच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे अभिनंदन केले. वाहतूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आल्याने तळेगाव शहरात आनंदाचे वातावरण होते.

(प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे)9921807011

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!