Homeक्राईममावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109 तसेच आर्म अॅक्ट 4 (25) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्ष वसंत कांबळे (वय 24, रा. ढोरेवाडा, वडगाव मावळ) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 16 मे 2026 रोजी पहाटे सुमारे 1.30 वाजण्याच्या दरम्यान मौजे निळशी, पो. खांडी, ता. मावळ येथील विश्वास देशमुख यांच्या घराच्या टेरेसवर ही घटना घडली.

फिर्यादीचे चुलते कुलदीप चंद्रकांत कांबळे (वय 34, रा. दहिसर, मुंबई) हे गावातील प्रमोद दत्तात्रय म्हसे यांच्यासमवेत टेरेसवर झोपलेले असताना अज्ञात इसमाने अचानक हल्ला केला. मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या तलवारीसारख्या दिसणाऱ्या धारदार हत्याराने आरोपीने कुलदीप कांबळे यांच्या चेहऱ्याच्या डाव्या गालावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 146/2026 दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद दि. 16 मे 2026 रोजी दुपारी 3.29 वाजता करण्यात आली. सदर FIR ही ई-साक्षी ॲपच्या माध्यमातून नोंदविण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मानसिंग कोचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक कैलास कदम यांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ करीत आहेत.

या घटनेमुळे निळशी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव येथे उद्या “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर”; नागरिकांना १५ हून अधिक महसुली सेवा...

वडगाव येथे उद्या “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर”; नागरिकांना १५ हून अधिक महसुली सेवा एकाच छताखाली उपलब्ध वडगाव मावळ : महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य...

रोहित पवारांच्या दाव्यानंतर राजकीय खळबळ; आमदार सुनील शेळकेंचे जोरदार प्रत्युत्तर

रोहित पवारांच्या दाव्यानंतर राजकीय खळबळ; आमदार सुनील शेळकेंचे जोरदार प्रत्युत्तर Rohit Pawar यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते भाजपमध्ये जाणार असून त्यांच्यासोबत १५ आमदारही जाणार...

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

error: Content is protected !!