Homeमहत्त्वाचेमावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या जिवंत देखाव्याचे तळेगावात भव्य उद्घाटन

मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या जिवंत देखाव्याचे तळेगावात भव्य उद्घाटन

मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या जिवंत देखाव्याचे तळेगावात भव्य उद्घाटन

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील सांस्कृतिक परंपरेत भर घालणारा आणि सामाजिक संदेश देणारा धर्मवीर शंभूराजे या जिवंत देखाव्याचा भव्य उद्घाटन सोहळा उद्या शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८:३० वाजता तळेगाव दाभाडे येथे पार पडणार आहे. हा उपक्रम माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भेगडे तालीम मंडळातर्फे आयोजित करण्यात आला आहे.

भेगडे तालीम मंडळाने सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्य करत तळेगाव शहरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या कार्य, त्याग आणि बलिदानावर आधारित जिवंत देखाव्याचे आयोजन होय.

मंडळाचे माजी अध्यक्ष गणेश आप्पा भेगडे यांनी माहिती दिली की, या देखाव्याचे उद्घाटन माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या निवासस्थानाजवळ करण्यात येणार असून, यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, माजी नगरसेवक किशोर छबुराव भेगडे, माजी नगरसेवक अरुण जगन्नाथ भेगडे (पाटील), माजी नगरसेवक संतोष मारुती भेगडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे, विश्व हिंदू परिषदेचे संतोष वसंतराव भेगडे (पाटील), माजी नगरसेविका संध्याताई गणेश भेगडे, भेगडे तालीम मंडळाचे अध्यक्ष समीर शंकरराव भेगडे,यांचा विशेष सहभाग राहणार आहे.

धर्मवीर संभाजी महाराज हे हिंदू सूर्य स्वराज्याचे रक्षक आणि देव, देश व धर्मासाठी त्याग, समर्पण व बलिदानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी या भव्य जिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले असून, हा मावळ तालुक्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सांस्कृतिक उपक्रम ठरणार आहे.

भेगडे तालीम मंडळाच्यावतीने मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून धर्मवीर शंभूराजेंचा हा भव्य जिवंत देखावा नक्की पाहावा आणि ऐतिहासिक परंपरेला उजाळा द्यावा.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!