मोरया प्रतिष्ठानने वडगाव शहरातील दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांसह पालकांचाही केला सन्मान
वडगाव मावळ : शहरातील मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील दहावी आणि बारावीच्या ८० टक्के पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित केला होता. या सोहळ्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच जागतिक पालक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या पालकांचाही विशेष गौरव करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यात शहरातील न्यू इंग्लिश स्कूल, पोद्दार स्कूल व रमेश कुमार सहानी स्कूल या शिक्षण संस्थेतील विद्यार्थी शिक्षक व पालक या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मोरया प्रतिष्ठान यांच्यावतीने पेन, फुल व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना पुण्याजवळील आंबेगाव येथे असणाऱ्या शिवसृष्टी दर्शनाचे मोफत पास देऊन सर्वांना गौरवण्यात आले.
यावेळी सत्कार सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील तज्ञ प्राध्यापक आयुब पिंजारी, चंद्रशेखर जाजू यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक करिअर संदर्भात विशेष मार्गदर्शन केले. सचिन ढोरे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे म्हणाले की या सत्कार सोहळ्याचा उद्देश हा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला अधिक बळ देणे हा हेतू आहे.
या सोहळ्यामध्ये तज्ञांनी केलेल्या करिअर मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात चांगले यश मिळण्याची प्रेरणा मिळेल असे मयूर ढोरे यांनी सांगितले. यावेळी मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी या सत्कार समारंभाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानले व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्याला विद्यार्थ्यांची व पालकांची मोठी उपस्थिती लाभली होती. या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















