Homeमहत्त्वाचेलोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती : मावळ पर्यटनाला नवा अध्याय - आमदार...

लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती : मावळ पर्यटनाला नवा अध्याय – आमदार सुनील शेळके 

लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती : मावळ पर्यटनाला नवा अध्याय – आमदार सुनील शेळके

पुणे : मावळ तालुक्यातील पर्यटनाला नव्या उंचीवर नेणारा आणि स्थानिक विकासाला चालना देणारा लोणावळा स्काय वॉक प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचत असून लवकरच प्रत्यक्षात उतरविण्यात येणार आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार सुनील शेळके यांच्यासह विविध विभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकल्पावर सविस्तर चर्चा केली.

बैठकीतील ठळक मुद्दे

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

प्रत्यक्ष जागेचा तांत्रिक आढावा घेण्यात आला.

विकास आराखड्यातील जागांची पडताळणी करण्यात आली.

पर्यायी कनेक्टिव्हिटी रस्त्यांची आखणी करण्यावर भर देण्यात आला.

स्थानिकांना रोजगारनिर्मिती, पर्यटनवाढ व शाश्वत विकासासाठी ठोस उपाययोजना ठरविण्यात आल्या.

पर्यटनासोबत रोजगाराची नवी दारे

या प्रकल्पामुळे मावळ तालुक्यातील युवक व उद्योजकांना नवे व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहेत. पर्यटनाला चालना मिळाल्याने स्थानिकांना हॉटेल व्यवसाय, गाईड सेवा, परिवहन व इतर पूरक उद्योगांची संधी मिळेल. शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर मावळ

लोणावळा हे आधीपासूनच देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणकेंद्र आहे. स्काय वॉक प्रकल्पामुळे लोणावळा आणि पवना धरण परिसर आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे उमटेल. त्यामुळे मावळातील पर्यटनाला नवे रूप मिळेल आणि स्थानिक गावांचा विकास वेगाने होईल.

आमदार सुनील शेळके यांचा विश्वास

“या प्रकल्पामुळे मावळ तालुक्यातील विकास वेगाने होईल. पवना धरण परिसरासह संपूर्ण मावळ तालुका पर्यटनाच्या नव्या युगात प्रवेश करेल. रोजगार, उद्योगधंदे आणि व्यवसायासाठी नवे दालन खुले होईल,” असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

नागरिकांची उत्सुकता वाढली

या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि समाधानाचे वातावरण आहे. स्काय वॉक प्रकल्प खरोखरच पूर्णत्वाला गेला तर मावळ तालुका पर्यटनाच्या क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!