Homeमहत्त्वाचेलोहगड भाजे रस्ता ताबडतोब रुंदीकरण करा.पर्यटक त्रस्त, शासन झोपेत

लोहगड भाजे रस्ता ताबडतोब रुंदीकरण करा.पर्यटक त्रस्त, शासन झोपेत

लोहगड भाजे रस्ता ताबडतोब रुंदीकरण करा.पर्यटक त्रस्त, शासन झोपेत

भाजे (मावळ) : जगप्रसिद्ध लोहगड किल्ल्याचे नाव जागतिक वारसा यादीत झळकले, पण या वारशाचा अभिमान बाळगणाऱ्या मावळात जाण्यासाठीचा भाजे–लोहगड रस्ता मात्र जीवघेणा सापळा ठरत आहे.

रस्त्याचे नावालाच रुंदीकरण केले असुन साईडला खड्ड्यांची साखळी, आणि प्रशासन मात्र ‘डोळे झाकून बसलेले.

दर आठवड्याला हजारो शिवप्रेमी, देशी-विदेशी पर्यटक लोहगडावर गर्दी करत आहेत. पण हा रस्ता इतका अरुंद व खराब झालेला आहे की, प्रवास म्हणजे अक्षरशः “जीव मुठीत घेऊन जाण्याचा खेळ” ठरत आहे. घाट सेक्शनमध्ये ठिकठिकाणी मोठे खड्डे, साईडला रेलिंगचा पत्ता नाही, वाहनं घसरतात, तर वाहतूक कोंडीत श्वास घेणंही अवघड होतं.

पर्यटकांना अपघाताचा धोका रोजच स्थानिक लोक त्रस्त, विदेशी पर्यटक संतप्त! मावळच्या या ऐतिहासिक राजधानीची प्रतिमा जगभरात मलीन होतेय. शासनाचे अधिकारी मात्र रस्त्यावर फिरकायलाही तयार नाहीत.

लोहगड विसापूर विकास मंचचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, मार्गदर्शक संदीप गाडे, कार्याध्यक्ष सागर कुंभार, खजिनदार अनिकेत आंबेकर आणि इतर पदाधिकारी यांनी “हा जीवघेणा रस्ता ताबडतोब रुंद करा” अशी जोरदार मागणी करत आहेत. त्यांनी यापूर्वीच पावसाळ्यात तहसीलदारांकडे निवेदन दिले होते. मात्र पावसाळा संपूनही अजूनही शासनाच्या फाइलवर धूळच आहे.

लोहगड-भाजे रस्त्याचे त्वरित रुंदीकरण, धोकादायक वळणांवर मजबूत रेलिंग, आणि संपूर्ण घाट विभागात ‘नो पार्किंग झोन’ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.

सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, संदीप गाडे, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, चेतन जोशी, बसप्पा भंडारी, गणेश उंडे, अजय मयेकर, अमोल मोरे, संदीप भालेकर, ओमकार मेढी, सिद्धू जाधव आदी कार्यकर्त्यांनी शासनाला इशारा दिला आहे

“लोहगडचा रस्ता रुंद नाही केला, तर आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!