Homeसामाजिकलोहगड विसापूर विकास मंचाचा विशेष सन्मान

लोहगड विसापूर विकास मंचाचा विशेष सन्मान

लोहगड विसापूर विकास मंचाचा विशेष सन्मान

तळेगाव दाभाडे : शहरात दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी वास्तु डेव्हलपर्स व तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांचा संयुक्त विद्यमाने, पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे २०० विद्यार्थी तसेच २०० पालक यांनी एकत्रित आनंद लुटला. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. तसेच आकर्षक ५ लकी ड्रॉ घेण्यात आले, ज्यामध्ये विजेत्यांना एकूण ₹ ७,५५,०००/- किमतीची कूपने देण्यात आली.

कार्यशाळेस सी.आर.पी.एफ. चे डी.आय.जी. वैभव चंद्रकांत निंबाळकर (I.P.S.) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध सिने अभिनेत्री कुमारी उर्मिला निंबाळकर यांचीही विशेष उपस्थिती लाभली. या प्रसंगी मावळ भागातील उल्लेखनीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

त्यामध्ये –राज्यस्तरावर मल्लखांब खेळात यश मिळवलेल्या कु. गार्गी ईश्वर देशमाने हिचा गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर कु. सेजल विश्वनाथ मोईकर हिने आशिया-पॅसिफिक आफ्रिका बेंचप्रेस चॅम्पियनशिप २०२४, दक्षिण आफ्रिका स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले असून तिचा सन्मान करण्यात आला. तसेच एस.बी.जी.एफ. तर्फे आयोजित अखिल भारतीय भगवद्गीता पठण स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या कु. अदित्री अभय व्यास हिचाही गौरव करण्यात आला.

विशेष सन्मान म्हणून लोहगड–विसापूर दुर्ग संवर्धन व लोहगड किल्ल्याचा UNESCO जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश व्हावा यासाठी मोलाचे कार्य करणाऱ्या ‘लोहगड विसापूर विकास मंचा’चा सत्कार करण्यात आला.

यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक  भारत अरुण वारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषद बांधकाम अभियंता  गौरी चव्हाण यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी “माझी वसुंधरा शपथ” घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.

ही कार्यशाळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडली. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली नाही तर त्यांना समाजातील मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!