Homeशहरवडगाव कातवी नगरपंचायत हद्दीतील वडगाव नगरपंचायत स्वागत कमानीवरील नाव बेकायदेशीर असल्याची वडगांव...

वडगाव कातवी नगरपंचायत हद्दीतील वडगाव नगरपंचायत स्वागत कमानीवरील नाव बेकायदेशीर असल्याची वडगांव ग्रामस्थांची मागणी

वडगाव कातवी नगरपंचायत हद्दीतील वडगाव नगरपंचायत स्वागत कमानीवरील नाव बेकायदेशीर असल्याची वडगांव ग्रामस्थांची मागणी

वडगांव मावळ : येथील मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेली स्वागत कमानीवर जे नाव आहे ते कुठल्याही प्रकारचे ठराव व ग्रामस्थांना विश्वासात न घेता टाकले आहे ते काढण्यात यावे असे लेखी निवेदन वडगांव नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी प्रवीण निकम यांना देण्यात आले.

यावेळी बाळासाहेब कृष्णराव ढोरे, किसनराव वहिले, प्रकाशराव कुडे, राजेंद्र कुडे, पंढरीनाथ राजाराम ढोरे, मयुर प्र. ढोरे, बापुसाहेब वाघवले, मनोज खं. ढोरे, चंदुकाका ढोरे राहुल ढोरे, अर्जुन ढोरे, आबा चव्हाण, सुरेश जांभूळकर, राजेंद्र वहीले, भाऊसाहेब तु. ढोरे, बाळासाहेब तुमकर, सुनील कोद्रे, नितीन चव्हाण, सचिन कडू, सागर ढोरे, गणेश अ. ढोरे, अमोल श्री. ढोरे व इतर ग्रामस्थ यांनी स्वागत कमानी वरील नाव काढण्याची मागणी केली आहे.

निवेदनात मध्ये असे म्हणाले आहे की आम्ही वडगावचे नागरिक असुन, वडगाव नगरपंचायत हददीतील वडगाव नगरपंचायतची स्वागत कमान हि जुना मुंबई-पुणे रस्ता राष्ट्रीय माहामार्ग १२६ यावर उभी आहे हि स्वागत कमान वडगाव गावाच्या पूर्वेस, वडगाव फाटा म्हणजे गावातील अक्षय हॉटेल या ठिकाणी आहे. आता वडगाव नगरपंचायत कमान मुळ स्टक्चर मध्ये व स्वागत कमानीवरील नावात बदल करण्यात आले आहे. याबाबत गावातील ग्रामस्थांना याबाबत कोणतीही पुर्व माहिती नाही. सदर वडगाव ग्रामस्थांचा व आमचा असा आरोप आहे कि, संबधित अधिकारी यानी मनमानी कारभार करून कोणतीही निविदा प्रकिया न करता, आर्थिक व फायदयासाठी देवाणघेवाण करून वडगाव नगरपंचायत स्वागतकमानमध्ये फेरबदल करून वडगांव नगरपंचायत स्वागत कमानीवरील नावात देखील बदल करण्यात आला आहे असे दिसत आहे. वडगाव नगरपंचायतने स्वागत कमानीवरील नावा बदल करण्यास कोणता ठराव अथवा परवानगी घेतली नाही या सर्व बाबींची माहीती वडगावचे नागरिक म्हणून नागरिकांना देण्यात आलेली नाही. आमच्या निदर्शनात वडगाव नगरपंचायतने खालीलपैकी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही असे दिसत आहे.

१) नगरपंचायतकमान व नावातबदल करण्यात आलेला ठराव

२) अदाज प्रत्रक

३) टी एस तांत्रिक मंजुरी

४) संबधित कामाची निविदा वर्तमानपत्रात दिलेली जाहीरात

५) नगरपंचायतने यावार केलेला खर्च माहीती

६) संबधित ठेकेदाराची माहीती

वडगाव नगरपंचायतकडे याची माहीती विचारणा केली असता सार्वजनिक बाधकाम विभागाकडे जाऊन विचारणा करा अशी सारवासारव उत्तरे देत आहेत परंतु ही वडगाव नगरपंचायत स्वागत कमान वडगाव ग्रुपग्रामपंचायत बरखास्त झाली व त्यानंतर वडगाव नगरपंचायत स्थापनेनंतर यावर वडगाव नगरपंचायतने खर्च केला आहे अशी माहीती मिळत आहे त्यामुळे वडगाव नगरपंचायत स्वागतकमान यावर पुर्ण अधिकार हा वडगाव नगरपंचायतचाच आहे वडगावचे ग्रामस्थ म्हणून आमचा असा आरोप आहे कि यामध्ये कुठेतरी वडगाव नगरपंचायत संबंधित काही स्थानिकांना हाताशी धरून वडगाव नगरपंचायत स्वागतकमानी वरील नावात बदल करून, आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचार केला आहे.

यावेळी वडगांव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी आपण यामध्ये लक्ष घालून संबधित अधिकारी याच्यावर योग्य ती कारवाई करून वडगाव नगरपंचायत स्वागत कमान पूर्ववत करावी अशा ग्रामस्थांनी सांगितले आहे.

यावेळी वडगांव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी प्रवीण निकम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्र व्यवहार करू योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

वडगांव ग्रामस्थांनी सांगितले की पुर्वेकडील कमानी ला ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांचे नाव देण्यात यावे व पश्चिमेस असलेल्या कमानी ला श्रीमंत सरदार महाजी शिंदे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून तळेगाव आगाराला नव्या बसेसची भेट; आगारातील बसेसची संख्या ४३...

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ; पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण   आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून तळेगाव आगाराला नव्या बसेसची भेट;...

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

error: Content is protected !!