वडगाव नगरपंचायतचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण लक्ष्मण निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण
वडगांव मावळ : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७८वा वर्धापन दिन गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळी ७ वा. ४५ मि. नगरपंचायत प्रांगणात मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण लक्ष्मण निकम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संप्पन झाला यावेळी शहरातील नागरिक, मान्यवर, शालेय विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष यांच्या समवेत राष्ट्रगीत, राज्यगीत, तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली,
न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ येथील विद्यार्थिनीने कचरा वर्गीकरणाबाबत पथनाट्य सादर केले, तसेच शहरातील शूरवीर माजी सैनिक यांचा नगरपंचायत च्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता” अंतर्गत शहरातून ढोल ताशाच्या गजरात तिरंगा प्रदर्शन यात्रा काढण्यात आली व श्रीमंत महादजी शिंदे उद्यान येथील विरांच्या कोणशीलेचे पुजन, पुष्पहार अर्पण करून देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जावनांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
तसेच नागरिकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाची ओळख म्हणून व तसेच नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे, राष्ट्रध्वजाबद्दल जागृती वाढवणे च्या अनुषंगाने शहरात एलईडी व्हेन द्वारे तिरंग्याची निर्मिती कशी झाली तरंग्याचे महत्व याबाबत शहरात विविध ठिकाणी लघु चित्रपट दाखवण्यात आला. तसेच शहरातून सर्व प्रभागांमध्ये तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती. सदर उपक्रमास सुमारे १०० नागरिकांचा व कर्मचारी सहभागी होते.
त्याच प्रमाणे दि. १ व १४ ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा- हरघर स्वच्छता अभियान” अंतर्गत शहरातील शाळा व महाविद्यालय येथे सेल्फी विथ तिरंगा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा दोड, तिरंगा प्रभात फेरी, तिरंगा ध्वज वाटप, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रश्नमंजुषा, तिरंगा चित्रकला स्पर्धा, तिरंगा रांगोळी स्पर्धा, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा पथनाट्य, स्वच्छता अभियान सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छता या प्रकारच्या उपक्रमातून नागरिकांमध्ये तिरंगा प्रति जनजागृती करण्यात आली.
सदर उपक्रम शून्य कचरा निर्मितीच्या अनुषंगाने राबविण्यात आले यामध्ये सर्व झेंडे कापडी वापरण्यात आले, कागदी पताका, फुले, हार यांचा वापर करण्यात आला होता कोणत्याही प्रकारचे एकलवापर प्लास्टिक किंवा आधी वस्तूंचा वापर करण्यात आला नाही




















