वडगाव मावळ : गणेशमूर्ती विटंबना प्रकरणावर उपोषणानंतर प्रशासनाची लेखी हमी
वडगाव मावळ (ता. मावळ) येथे नगरपंचायतच्या निष्काळजीपणामुळे गणेशमूर्तीची विटंबना झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. धार्मिक भावनांचा अपमान झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशन समोर उपोषण केले.
ग्रामस्थांची ठाम मागणी होती की, या प्रकरणात जबाबदार असलेल्या नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व संबंधित ठेकेदारांवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तसेच मूर्तीची विटंबना केल्याबद्दल तत्काळ गुन्हा दाखल करावा. यावेळी उपोषणास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कडक भूमिकेमुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता होती. मात्र, पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे तोडगा निघाला. पोलिसांनी उपोषणकर्त्यांना लेखी हमी दिली की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यानंतर गणेशाची महाआरती करण्यात आली व उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी अविनाशजी बवरे, अतुल राऊत, विशाल वहिले, सायली म्हाळसकर, सुनिल शिंदे, मंगेश खैरे, सोमनाथ धोंगडे, मच्छिंद्र मोहिते, गणेश भांगरे, राजेश बाफना, योगेश ढोरे, अनिल नायर, आशिष म्हाळसकर, अॅड शंकर ढोरे, गणेश म्हाळसकर, उमेश ढोरे, बाळासाहेब शिंदे, प्रभाकर वाघमारे, राहुल म्हाळसकर, विशाल म्हाळसकर, विकास साबळे, संकेत रौंधळ, मनिष चव्हाण, भूषण वहिले, समीर भोसले, नवनाथ शिवेकर, गणेश दत्तात्रय म्हाळसकर, गौतम सोनवणे, निलेश म्हाळसकर, संजय शिंदे, तानाजी तोडकर, महेंद्र शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रकरणामुळे वडगाव मावळात चर्चेला जोर आला असून, नागरिक आता चौकशी व कारवाईची वाट पाहत आहेत. स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, नगरपंचायतच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या प्रकाराला जबाबदार कोण? धार्मिक भावना दुखावण्यासारखी गंभीर घटना घडूनही संबंधित अधिकारी व ठेकेदार मोकळे राहणार की कठोर कारवाई होणार?




















