Homeसामाजिकवडगाव मावळ : वंचित बहुजन आघाडीचा भव्य एल्गार मोर्चा – अन्यायाविरोधात जनआक्रोश

वडगाव मावळ : वंचित बहुजन आघाडीचा भव्य एल्गार मोर्चा – अन्यायाविरोधात जनआक्रोश

वडगाव मावळ : वंचित बहुजन आघाडीचा भव्य एल्गार मोर्चा – अन्यायाविरोधात जनआक्रोश

वडगाव, दि. ११ सप्टेंबर २०२५

मावळ तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय आणि शेतकरी प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य असा एल्गार मोर्चा काढण्यात आला. श्री पोटोबा महाराज प्रांगणातून निघालेला हा मोर्चा वडगाव तहसील कार्यालयावर येऊन संपन्न झाला.

हा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाखाली आणि पुणे जिल्हा अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. मोर्चाचे नेतृत्व मावळ तालुका अध्यक्ष नितीन भाऊ ओव्हाळ यांनी केले. तसेच संदीप भाऊ कदम (युवा आघाडी अध्यक्ष) आणि मनीषाताई ओव्हाळ (महिला आघाडी तालुका अध्यक्षा) यांच्या नियोजनामुळे हा मोर्चा यशस्वी झाला.

प्रमुख मागण्या

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई

दिनांक १४ ऑगस्ट रोजी लोणावळ्यातील घटनेचा निषेध करत, सदर इसमावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा, ही ठाम मागणी करण्यात आली.

वारंवार होत असलेल्या अशा विटंबनांमुळे समाजात तणाव, सलोखा भंग होत असून, यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी कठोर शासन कारवाईची मागणी करण्यात आली.

2. जन सुरक्षारक्षक कायदा रद्द करावा

हा कायदा लोकशाहीस धोका असून, सामान्य जनतेच्या स्वातंत्र्यावर गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे. लोकशाहीऐवजी हुकूमशाही आणण्याचे षडयंत्र असल्याचे आघाडीचे म्हणणे.

3. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

मे महिन्यापासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे मावळातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. भात शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी.

4. शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात

ऑनलाइन अर्ज प्रणालीमुळे ग्रामीण व गरीब शेतकरी वंचित राहतात. शासनाने पर्यायी उपाययोजना करून गरजूंना प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी ठोस पावले उचलावीत.

5. स्थानिक प्रश्न

मावळातील रस्त्यांची दुरावस्था

समाजमंदिरांसाठी निधी उपलब्ध करणे

स्मार्ट मीटरमुळे वाढलेली वीज बिलं नियंत्रणात आणणे

दलित सुधार वस्तीच्या निधीचा पारदर्शक तपशील

मोर्चात मोठ्या प्रमाणावर उपस्थिती

मोर्चात तालुक्यातील सर्वच भागातून लोकांची गर्दी झाली. वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, माथाडी कामगार युनियन तसेच आंबेडकरी चळवळीतील संस्था सक्रियपणे सहभागी झाल्या.

प्रमुख मान्यवर व पदाधिकारी

जयश्रीताई सदावर्ते – पुणे जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष

लोकेश भडकवाड – लोणावळा शहराध्यक्ष व कमिटी

दिनेश गवई – तळेगाव शहराध्यक्ष व कमिटी

संजय कुलकर्णी – माथाडी कामगार अध्यक्ष

महेश परमार – कामशेत शहराध्यक्ष व कमिटी

करण भालेराव – लोणावळा शहर युवा अध्यक्ष

प्रमोद खंडारे – वडगाव शहर युवा अध्यक्ष

सागर शिंदे – पवन मावळ अध्यक्ष

संध्याताई गायकवाड – वडगाव महिला आघाडी शहराध्यक्षा

संगीता अवचर – लोणावळा महिला आघाडी शहराध्यक्षा

वैशालीताई गायकवाड – मोहितेवाडी अध्यक्षा

तेजस्विनी चव्हाण – कामशेत महिला आघाडी शहराध्यक्षा तसेच तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!