वडगाव मावळमध्ये सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवाचा जल्लोष
वडगाव मावळ : (प्रतिनिधी)
गणेशोत्सवाचे औचित्य साधून वडगाव मावळ परिसरात सार्वजनिक गणपती मंडळे तसेच घरगुती गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने झाले. गणेश मंडळांनी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पाडली.
ग्रामदैवत तिर्थक्षेत्र पोटोबा देवस्थान सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सोहळ्याने सुरुवात झाली. यासोबतच जय बजरंग तालीम मित्र मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ, बालविकास मित्र मंडळ, जय जवान किसान मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, गणेश तरुण मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, कानिफनाथ मित्र मंडळ, नवचैतन्य मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, क्रांती मित्र मंडळ, दिग्विजय मित्र मंडळ, पंचशील मित्र मंडळ, शिवशंभो मित्र मंडळ, मयूरेश्वर मित्र मंडळ, पंचमुखी मित्र मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ, वक्रतुंड मित्र मंडळ, एकविरा मित्र मंडळ, शितळदेवी मित्र मंडळ, ॐकार मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, माळीनगर मित्र मंडळ, स्वराज मित्र मंडळ, इंद्रायणी मित्र मंडळ, योगेश्वर मित्र मंडळ, विजयनगर मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ तसेच वडगांव नगरपंचाय, पोलिस स्टेशन वडगाव मावळ यांसह अनेक मंडळांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली.
गावात सर्वत्र मंगलमय वातावरण असून पारंपरिक व आधुनिक अशा सजावटींनी मंडळे सजली आहेत. मंडळांकडून धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून विविध भक्तिमय कार्यक्रमांनी गणेशोत्सव रंगणार आहे.
वडगाव मावळमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकता, उत्साह आणि भक्तीचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.






















