श्री डोळसनाथ महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वारकऱ्यांना तंबू देण्यात आला
तळेगाव दाभाडे : शहरातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या श्री डोळसनाथ महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने देहू ते पंढरपूर पवन मावळ दिंडी क्रमांक ३१६ या पायी वारी सोहळ्यातील वारकऱ्यांना पाऊसापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि आराम करण्यासाठी तंबू देण्यात आला.
पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे, पतसंस्थेचे आधारस्तंभ नगरसेवक संतोष मारुती भेगडे, पतसंस्थेचे अध्यक्ष शरद बबनराव भोंगाडे, उपाध्यक्ष समीर शंकर भेगडे, सचिव अतुल राऊत, खजिनदार अमित अरुण भसे, पतसंस्थेच्या व्यवस्थापिका तस्लिम शिकिलकर यांच्या हस्ते पतसंस्थेच्या कार्यालयात हा तंबू देण्यात आला.
यावेळी पवन मावळ दिंडी अध्यक्ष हरिभक्त परायण शांताराम बोडके, सचिव रवींद्र घारे, उपाध्यक्ष संतोष मुर्हे उपस्थित होते. पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी वारकऱ्यांना छत्री. रेनकोट. तंबू तसेच रोख रक्कम आदी वाटप करण्यात येते.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















