Homeमहत्त्वाचेसकल मराठा समाजाचा मुंबई दौरा : मावळ तालुक्यातील नियोजन बैठक पार पडली

सकल मराठा समाजाचा मुंबई दौरा : मावळ तालुक्यातील नियोजन बैठक पार पडली

देहू (प्रतिनिधी) : सकल मराठा समाज पुणे जिल्हा व मावळ तालुक्याच्या वतीने निस्वार्थी मराठा समाज योद्धा मनोज जरांगे पाटील व महाराष्ट्रातील तमाम मराठा सेवकांच्या भव्य मुंबई दौऱ्याचे स्वागत करण्यासाठी मावळ तालुक्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

पुणे व मावळातून निघणाऱ्या या रॅलीचे स्वागत भव्य-दिव्य पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने या रॅलीसोबत मुंबई गाठण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा मंदिर शेजारील अभंग मंगल कार्यालय, देहू येथे निर्णायक नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.

बैठकीदरम्यान रॅलीसाठी स्वागत कमिटी, वाहनांची व्यवस्था, युवक-युवतींचा सहभाग, महिला मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग तसेच शिस्तबद्ध पद्धतीने मुंबईकडे कूच करण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आले. समाजातील मान्यवरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाज आंदोलनाला भक्कम पाठिंबा देण्याची ग्वाही यावेळी दिली.

या बैठकीला पुणे व मावळ परिसरातील शेकडो मराठा सेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजाचे ऐक्य, ताकद आणि हक्काच्या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!