Homeसामाजिकसरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सव मंडळांचा सन्मान

सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सव मंडळांचा सन्मान

सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सव मंडळांचा सन्मान

तळेगाव दाभाडे : गणेशोत्सव हा सामाजिक एकोप्याचा आणि सांस्कृतिक जपणुकीचा उत्सव आहे. परंतु डीजेमुळे अनेकांना त्रास होतो, त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी यावर उपाययोजना करावी, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले.

सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान, मावळ यांच्या वतीने विविध गणेशोत्सव मंडळांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धांच्या विजेत्यांना रविवारी (२० सप्टेंबर) नाना-नानी पार्क, तळेगाव दाभाडे येथे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, आमदार सुनील शेळके उपस्थित होते. यावेळी सत्यशीलराजे दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळेगाव शहर महिला अध्यक्षा शैलजा काळोखे, माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे, अध्यक्ष दीपक दाभाडे, माजी तहसीलदार रामभाऊ माने, समाजभूषण अण्णासाहेब दाभाडे, माजी नगरसेवक निखिल भगत, संजय बाविस्कर, सौरभ चिंचवडे, माजी नगरसेविका शोभाताई भेगडे, रजनी ठाकूर, माजी नगराध्यक्ष नाना करके आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले, “पूर्वी गणेशोत्सव मंडळांमुळे मैत्री, एकोप्याचा भाव वाढायचा. आजही तोच उत्साह कायम राहावा. संतोष दाभाडे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम दरवर्षी होत राहावा, ही गणेश चरणी प्रार्थना आहे.”

सुनील रासने यांनी मंडळांचे कौतुक करताना उत्तम देखावे साकारल्याबद्दल समाधान व्यक्त केले. गणेश खांडगे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही तळेगावची परंपरा असल्याचे सांगितले.

संतोष दाभाडे यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत सांगितले की, सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा पुतळा नगरपरिषदेत बसविण्यात येणार असून समाधीचा जीर्णोद्धारही होणार आहे.

प्रकाश ओसवाल यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण विषयक कार्याचा गौरव केला व उमाबाई दाभाडे यांच्या स्मारकाची अपेक्षा व्यक्त केली.

मंगलमूर्ती पुरस्कार (प्रथम क्रमांक) : डोळसनाथ मित्र मंडळ, डोळसनाथ कॉलनी

उत्कृष्ट मूर्तिकार : दिनेश भिकोले

स्थिर देखावा प्रथम क्रमांक : फेंडस क्लब मित्र मंडळ तेली आळी (हरीश्चंद्र गड गुहा)

हलता देखावा प्रथम क्रमांक : मुरलीधर मित्र मंडळ खळदे आळी

जिवंत देखावा प्रथम क्रमांक : भेगडे तालीम मित्र मंडळ (धर्मवीर शंभुराजे)

विद्युत रोषणाई प्रथम क्रमांक : अष्टविनायक मित्र मंडळ, सुभाष चौक

ढोल ताशा उत्कृष्ट पथक : सिद्धगणेश पथक, गणेश तरुण मंडळ

गो. नि. दांडेकर पुरस्कार (उत्कृष्ट कलाकार) :

पुरुष विभाग : संजय केसकरमी (औरंगजेब भूमिका)

महिला विभाग : धनश्री मिननाथ दाभाडे (ऊमाबाई दाभाडे भूमिका)

लोकप्रिय बालकलाकार : कु. काव्यश्री विनय दाभाडे (बाल शंभुराजे भूमिका)

याशिवाय विविध विभागांतील मंडळांना, पथकांना व कलाकारांना विशेष सत्कार व उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. विनय चंद्रकांत दाभाडे यांनी केले. आभार आनंद दाभाडे यांनी मानले.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. 9921807011)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!