Homeमहत्त्वाचेसह्याद्रीनामा वृत्ताचा परिणाम; बनेश्वर स्मशानभूमीतील अंधकार दुर

सह्याद्रीनामा वृत्ताचा परिणाम; बनेश्वर स्मशानभूमीतील अंधकार दुर

सह्याद्रीनामा वृत्ताचा परिणाम; बनेश्वर स्मशानभूमीतील अंधकार दुर

तळेगाव दाभाडे: शहरातील गावभागात असलेल्या बनेश्वर स्मशानभूमीतील अंधकार अखेर दूर झाला असून, माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची दखल घेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेने तातडीने कारवाई केली आहे. स्मशानभूमीत बसवण्यात आलेले हायमास्ट दिवे प्रशासनाच्या बेफिकिरीचे प्रतीक बनले होते. एकूण आठ हायमास्ट दिव्यांपैकी केवळ दोनच दिवे सुरू असल्याने उर्वरित परिसर अंधारात बुडाला होता. त्यामुळे रात्रीच्या वेळी मृत व्यक्तीवर अंतिम संस्कार करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या संदर्भात स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ “बघू” असा अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र सह्याद्रीनामा न्यूज पोर्टलने २५ ऑक्टोबर २०२५ रोजी हायमास्ट दिव्यांच्या दुरवस्थेवर सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत नगर परिषदेने तत्काळ दुरुस्तीचे आदेश दिले.

त्यानुसार बनेश्वर स्मशानभूमीतील सर्व आठही हायमास्ट दिवे कार्यान्वित करण्यात आले असून, सध्या संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. या कारवाईमुळे स्मशानभूमीत जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला असून, अंतिम संस्कार विधी सन्मानपूर्वक व अडथळ्याविना पार पडत आहेत.

नगर परिषदेच्या या तत्परतेबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सह्याद्रीनामा न्यूज पोर्टलच्या पाठपुराव्यामुळेच ही समस्या मार्गी लागली. अन्यथा ही बाब अजूनही दुर्लक्षितच राहिली असती,” अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली. माध्यमांनी समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधल्यास प्रशासनाला कृती करावीच लागते, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!