Homeसामाजिकस्व. गणपतराव पंढरीनाथ शिंदे स्मृती भव्य समूह नृत्य स्पर्धेत मामासाहेब खांडगे इंग्लिश...

स्व. गणपतराव पंढरीनाथ शिंदे स्मृती भव्य समूह नृत्य स्पर्धेत मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलला प्रथम क्रमांक

स्व. गणपतराव पंढरीनाथ शिंदे स्मृती भव्य समूह नृत्य स्पर्धेत मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलला प्रथम क्रमांक

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगरीचा मानाचा पाचवा गणपती म्हणून ख्याती असलेल्या श्री गणेश तरुण मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्व. गणपतराव पंढरीनाथ शिंदे स्मृती भव्य समूह नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. सुशीला मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याला पंचक्रोशीतील शाळांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक राजू शंकरराव शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या कला आणि कौशल्याचे कौतुक करताना, “गेल्या वीस वर्षांपासून ही स्पर्धा मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे, हे आमच्यासाठी अभिमानाचे आहे,” असे मत व्यक्त केले.

उत्स्फूर्त सहभाग

या स्पर्धेत तब्बल २० शाळांमधील सुमारे ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. रंगतदार पोशाख, पारंपरिक तसेच आधुनिक नृत्यरचना, तालबद्ध सादरीकरण यामुळे सभागृहात उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. स्पर्धा स्थळी प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.

निकाल पुढीलप्रमाणे :

बालवाडी गट

प्रथम : पैसा फंड शाळा (गट ब)

द्वितीय : पैसा फंड शाळा (गट अ)

उत्तेजनार्थ : ज्ञानयोग प्रायमरी

पहिली ते चौथी गट

प्रथम : ज्ञानयोग स्कूल

द्वितीय : पैसा फंड विद्यालय (गट ब)

उत्तेजनार्थ : सरस्वती विद्यामंदिर, इंदोरी

पाचवी ते सातवी गट

प्रथम : मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूल

द्वितीय : सरस्वती विद्यामंदिर, तळेगाव दाभाडे

उत्तेजनार्थ : अॅड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर, तळेगाव दाभाडे

विशेष पारितोषिक (माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या वतीने) : आदर्श विद्यामंदिर, तळेगाव दाभाडे

याशिवाय, या स्पर्धेत स्व. इंदुबाई शंकरराव शिंदे स्मृती पारितोषिक देखील प्रदान करण्यात आले.

मान्यवर व परीक्षक

स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. सुचित्रा कुलकर्णी व सौ. मानसी आपटे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाला उद्योजक राजू शिंदे, शाहीर-कवी दत्तात्रेय मेढी, मंडळ अध्यक्षा डॉ. राधिका हेरेकर, उपाध्यक्ष सिद्धू जाधव, प्रशांत खर्डेकर, महेश सोनपावले, प्रतीकभाई मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यकर्त्यांचा सहभाग

मंडळाच्या सांस्कृतिक प्रमुख मुक्ता भावसार, वैष्णवी आंबेकर, अथर्व कुलकर्णी, ऋतिक पाटील, रोहन मराठे, साहिल गुप्ते, आर्य मेढी, सानिका टकले, शिवानी कर्वे आदी कार्यकर्त्यांनी मोठ्या परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी केला.

सूत्रसंचालन व आभार

प्रख्यात व्याख्याते श्रीकांत मेढी यांनी सुरेख सूत्रसंचालन केले तर महेश सोनपावले यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले. बक्षीस वितरण सोहळ्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!